घरी बनवा या चटपटीत डिश आणि पाऊस करा एन्जॉय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 19:20 IST2018-06-29T19:16:55+5:302018-06-29T19:20:00+5:30
पाऊस म्हटलं की खाणं चटपटीत खाण्याची इच्छा होतेच ! पण बाहेरच तेलकट आणि अस्वच्छ खाण्यापेक्षा तुम्ही घरीही काहीतरी सोपं, चवदार, चटपटीत बनवू शकता. हे पदार्थ बनवून घरच्यांना खुश करा आणि बनवा तुमचा पावसाळा चविष्ट.

घरी बनवा या चटपटीत डिश आणि पाऊस करा एन्जॉय
पुणे : पाऊस म्हटलं की खाणं चटपटीत खाण्याची इच्छा होतेच ! पण बाहेरच तेलकट आणि अस्वच्छ खाण्यापेक्षा तुम्ही घरीही काहीतरी सोपं, चवदार, चटपटीत बनवू शकता. हे पदार्थ बनवून घरच्यांना खुश करा आणि बनवा तुमचा पावसाळा चविष्ट.
स्वीटकॉर्न भजी :
कांदाा किंवा बटाटा भजी सगळ्यांना माहिती आहे. पण उकडून मिक्सरमध्ये क्रश केलेले स्वीटकॉर्न, डाळीचं पीठ, एक चमचा तांदूळ पीठ, तिखट, मीठ आणि भरपूर कोथिंबीर घातलेले कॉर्न भजीही भन्नाट लागतात.
फ्लॉवरचे मंचुरियन
पाण्यात मीठ घालून वाफवलेले फ्लॉवरचे मोठे तुकडे बाहेर काढून त्यांना मैदा, कॉर्नफ्लोअर, तिखट, मीठ, आले लसणाचे वाटण घातलेल्या पिठातून काढून तळावेत. दुसऱ्या कढईत चायनीजच्या सोया, चिली, टोमॅटो सॉस घालून परतून घालून परतावे. कोथिंबीर घालून सर्व करा झटपट फ्लॉवर मंचुरियन.
चटपटीत वांगी :
कॉर्नफ्लोअर, तिखट, मीठ, एक चमचा तांदुळाचे पीठ एकत्र करून पातळ घोळ करावा. मोठी वांगी गोल चकत्यांमध्ये कापून पाण्यात टाकावी. एकेक चकती पिठात घोळवून तव्यावर शॅलो फ्राय करावी. सर्व्ह करताना वरून थोडासा चाट मसाला भुरभुरावा.
क्रिस्पी भेंडी :
भेंडी उभी, पातळ चिरून भांड्यात घ्यावी. त्यावर मीठ, लाल तिखट, कॉर्नफ्लोअर टाकून भेंडीत असलेल्या ओलाव्यातच भिजवावे. मावेल तेवढेच पीठ टाकावे. पाणी वापरू नये. तापलेल्या तेलात ही भेंडी तळून घ्यावी. सर्व्ह करताना लाल तिखट आणि चाट मसाला टाकावा. कुरकुरीत भेंडी तयार.