आंब्यावर ताव मारता आहात की नाही?
By Admin | Published: June 8, 2017 01:53 PM2017-06-08T13:53:58+5:302017-06-08T13:53:58+5:30
फळांचा राजा, तुमच्या आरोग्यासाठीही राजा, बहुगुणी आंब्याचे फायदेच फायदे..
- मयूर पठाडे
या दिवसांत तुम्ही आंब्यावर चांगलाच ताव मारला असेल. नाही? फळांच्या या राजाकडे नुसतं पाहिलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पण हा आंबा आपल्या आरोग्यासाठहीी किती फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहीत आहे?
आंब्यात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे तो तुमचं नुसतं आरोग्यच चांगलं राखत नाही, तर अनेक विकारांपासून तुम्हाला मुक्तीही मिळवून देतो.
बहुगुणी आंबा
४- भुकेवर आणि वजनावर कंट्रोल
वाढत्या वजनाला आळा कसा घालायचा हा आजकाल सर्वांपुढेच मोठा प्रश्न असतो. पण आंब्यात असलेल्या लेप्टिनमुळे तुमची ही समस्या दूर होऊ शकते. कारण ते तुमच्या भुकेवर कंट्रोल ठेवतं आणि तुमची सारखी ‘खा खा’ होत नाही. याशिवाय आंब्याची कोयदेखील तुमच्या शरीरातील वाढत्या चरबीला रोखून धरते.
५- दृष्टीत सुधार
आंब्यामध्ये अ जिवनसत्वाची मात्रा खूप मोठ्या प्रमाणावर असते. अ जिवनसत्व डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं. आंब्याच्या नियमित सेवनामुळे आपले डोळे चांगले राहाण्यास मदत होते. आपली दृष्टी तर त्यानं सुधारतेच, पण मोतीबिंदूसारख्या समस्यांपासूनही आपण दूर राहू शकतो.