राजमा खाण्याचे शौकीन असाल तर, गॅसची समस्या अशी टाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:59 PM2019-04-22T17:59:00+5:302019-04-22T18:03:32+5:30
आपल्यापैकी अनेक लोक राजमा खाण्याचे शौकीन असतात. अनेक प्रकारची पौष्टिक तत्व असल्यामुळेही काही लोकांना राजमा पचण्यास त्रास होतो.
आपल्यापैकी अनेक लोक राजमा खाण्याचे शौकीन असतात. अनेक प्रकारची पौष्टिक तत्व असल्यामुळेही काही लोकांना राजमा पचण्यास त्रास होतो. जर तुम्हालाही असं वाटतं असेल की, राजमा खाल्याने तुमची तब्बेत बिघडू शकते. तर तुम्हाला राजमा शिजवण्याची योग्य पद्धत माहीत नाही. प्रत्येक पदार्थांसाठी काही आवश्यक मसाले सांगण्यात आलेले आहेत. ज्यांचा समावेश करून तुम्ही राजमाची पौष्टिकता आणखी वाढवू शकता, तेही कोणतंही नुकसान न करता. जाणून घेऊया हेल्दी राजमा तयार करण्याची पारंपारिक पद्धत...
पौष्टिकतेने परिपूर्ण आहे राजमा
राजमा ज्याला किडनी बीन्स असंही म्हणतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. एक कप उकडलेल्या राजम्यामध्ये जवळपास 15 ग्रॅम प्रोटीन असतं. जर तुम्ही शाकाहारी असाल तर राजम्यामधून प्रोटीन्सही मिळतात. राजमामध्ये फेजोलिन नावाच्या प्रोटीनमुळे शरीराचा अॅलर्जीपासून बचाव होतो. याव्यतिरिक्त राजमामध्ये रेक्टिन्स आणि प्रोटीन्सदेखील असतं. राजमामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे राजमा खाल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. फायबर पोट साफ करण्यासाठी मदत करतं आणि त्यामुळे लिव्हरच्या समस्याही ठिक होतात. राजमा खाल्याने शरीरामध्ये ब्यूट्रेट, एसीटेट आणि प्रॉपिनेट यांसारखे फॅटी अॅसिड निर्माण होतात. ज्यामुळे कोलन कॅन्सरची आशंका कमी होते.
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात
राजमा व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असल्यामुळे राजमा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. राजमामध्ये आयर्न, कॉपर, मॅग्नीज, पोटॅशिअम, मॉलिब्डिनम आणि फॉलेट आढळून येतं. ही सर्व तत्व शरीराला पोषण देतात आणि आपल्या अनेक आजारांपासून दूर ठेवतात. याव्यतिरिक्त राजमामध्ये असणारं व्हिटॅमिन के 1 म्हणजेच, फायलोक्विनोन आणि व्हिटॅमिन बी 9 मुबलक प्रमाणात आढळून येतं.
गॅसचा त्रास का होतो?
जेव्हा आपण बीन्स खातो त्यावेळी त्यांच्यामध्ये असलेलं स्टॅकियोज आणि रॅफइनोज नावाचे दोन स्टार्च गॅस तयार करतात. कारण आपल्या आतड्यांना ब्रेक करण्याची क्षमता नसते. पोटामध्ये असलेले बॅक्टेरिया हे स्टार्च हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साइडमध्ये बदलतं. ज्यामुळे गॅसचा प्रॉब्लेम होतो.
असं तयार केल्याने गॅस होत नाही
राजमा तयार करण्याची योग्य पद्धत म्हणजे, सर्वात आधी राजमा भिजत ठेवा, त्यानंतर तो उकडून घ्या. त्यानंतर तुम्ही राजमा खाल्ला तर पोटाच्या कोणत्याही समस्या होणार नाहीत. राजमा कमीत कमी 8 तासांसाठी भिजत ठेवा. तज्ज्ञांच्या मते, फार कमी लोकांना राजमा खाल्यानंतर गॅस तयार होण्याची समस्या होते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की, राजमा शिजवताना तो पूर्ण शिजवून घ्या.
या मसाल्यांचा वापर करणं विसरू नका
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये काही खास मसाल्यांचा समावेश करण्यात आला आहे. जे नुकसान कमी करून पदार्थांची पौष्टिकता वाढवतात. राजमामध्ये स्टार्च असल्यामुळे जेव्हाही तुम्ही राजमा शिजवून घेत असाल त्यावेळी त्यामध्ये हिंगाचा वापर नक्की करा. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही थोडासा ओवा देखील एकत्र करू शकता.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.