...म्हणून उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवन करणं टाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 04:38 PM2019-04-04T16:38:51+5:302019-04-04T16:39:39+5:30
उन्हाळ्यामध्ये त्वचेसोबतच आरोग्याचीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. उन्हाळ्यामध्ये बाहेरील पदार्थ खाल्याने पोट लवकर खराब होतं. अशातच काहीही खाल्याने उलट्या होणं, डोकेदुखी, पोटाच्या समस्या इत्यादी होऊ शकतात.
(Image Credit : Elite Daily)
उन्हाळ्यामध्ये त्वचेसोबतच आरोग्याचीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. उन्हाळ्यामध्ये बाहेरील पदार्थ खाल्याने पोट लवकर खराब होतं. अशातच काहीही खाल्याने उलट्या होणं, डोकेदुखी, पोटाच्या समस्या इत्यादी होऊ शकतात. याव्यतिरिक्त जर उन्हाळ्यामध्ये खाण्या-पिण्याकडे लक्षं दिलं नाही तर टायफॉइडही होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो बाहेरी पदार्थांचं सेवन करणं टाळा. आहारामध्ये पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत, ज्यांचा उन्हाळ्यामध्ये आहारात समावेश करणं शक्यतो टाळावं. जाणून घेऊया अशा पदार्थांबाबत...
मसाले
अनेक लोकांना सर्वात जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असते. मसालेदार अन्नपदार्थ उन्हाळ्यामध्ये आरोग्यासाठी नुकसानदायी ठरतात. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. मिरची, आलं, काळी मिरी, जीरं आणि दालचिनी या पदार्थांचा मसाल्याच्या पदार्थांमध्ये समावेश होतो. हे पदार्थ उष्ण असतात. यांच्या सेवनाने शरीरातील उष्णता वाढते. तसेच मसालेदार पदार्थांच्या सेवनाने मेटाबॉलिज्मही वाढतं.
तेलकट पदार्थ आणि जंक फूड
जास्त तेलकट पदार्थ आणि जंक फूडपासून दूर रहा. ऑयली आणि जंक फूड कोलेस्ट्रॉल लेव्हल, फॅट इत्यादी वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे याच्या सेवनाने पौट खराब होतं आणि फूड पॉयझनिंग होण्याचीही शक्यता असते.
चहा किंवा कॉफी
अनेक लोक अशी असतात जी उन्हाळ्यामध्ये ऑफिसमध्ये सतत चहा किंवा कॉफीचं सेवन करत असातात. असं केल्याने शरीरातील उष्णता वाढते. यामध्ये अस्तित्वात असणारं कॅफेन आणि शुगर यांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे उन्हाळ्यातही हेल्दी राहण्याची इच्छा असेल तर यांपासून दूर रहा.
चिकन किंवा मासे
चिकनचं अधिक सेवन करणं टाळा. तसेच फिश ग्रेवी, तंदूरी चिकन किंवा सीफूड खात असाल तर उन्हाळ्यामध्ये यापासून थोडं लांब रहा. यामुळे पचनशक्ती कमजोर होते. तसेच डायरियाही होण्याची शक्यता असते. मांसाहारी पदार्थ शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण करण्याचं काम करतात. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश करणं टाळावं.
ड्राय फ्रूट्स
ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी हेल्दी आणि पौष्टिक असतात. परंतु उन्हाळ्यामध्ये यांचंही सेवन कमी करावं. या पदार्थांमध्ये निसर्गतः उष्ण गुणधर्म असतात. जे शरीराची उष्णता वढविण्याचंकाम करतात.
सॉस कमी प्रमाणात खा
उनहाळ्यामध्ये चीज सॉसचं सेवन करणं शक्यतो टाळा. काही सॉस तयार करताना त्यामध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट असतं.जे आरोग्यासाठी हानिकारक असतं. त्याऐवजी तुम्ही घरीच तयार केलेल्या चटणीचं सेवन करा. पुदिना, कोथिंबीर, लसूण, आवळा, हिरवी मिरची यांपासून तयार करण्यात येणारी हिरवी चटणी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
आइसक्रीम आणि कोल्ड ड्रिंक
खरं तर हे पदार्थ थंड असतात पण बॉडी वॉर्मिंग फूड आहेत. हे पदार्थ खाल्याने तुम्हाला थोड्या वेळासाठी बरं वाटेल परंतु तुमच्या हृदयासाठी हे नुकसानदायी असतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.