ग्रीन टी पिताना तुम्हीही करता का या चुका?; पडू शकतात महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 12:12 PM2019-09-08T12:12:57+5:302019-09-08T12:19:16+5:30
तुमच्या वाढलेल्या वजनामुळे एखादा फेवरेट ड्रेस घट्ट होतोय का? किंवा एखाद्या जवळच्या लग्नामध्ये फ्लॅट टमीसोबतच फ्लॉन्ट करायचंय? या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आपल्या डाएटमध्ये ग्रीन टीचा समावेश करावा लागेल.
तुमच्या वाढलेल्या वजनामुळे एखादा फेवरेट ड्रेस घट्ट होतोय का? किंवा एखाद्या जवळच्या लग्नामध्ये फ्लॅट टमीसोबतच फ्लॉन्ट करायचंय? या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आपल्या डाएटमध्ये ग्रीन टीचा समावेश करावा लागेल. याच कारणामुळे ग्रीन टी, जगभरामध्ये मॅजिकल टी च्या रूपात प्रसिद्ध झाली आहे. अनेक संशोधनांमधून ग्रीन टीच्या फायद्यांबाबत अनेक गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. परंतु, ग्रीन टीचं सेवन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. जाणून घेऊया सविस्तर...
ग्रीन टी असा ठरतो फायदेशीर...
आता जवळपास सर्वांनाच ग्रीन टी चे फायदे माहीत असतील. खासकरुन वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक ग्रीन टी चं अधिक सेवन करतात. तसेच हृदयरोग, पचनक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती आणि मेटाबॉलिज्मसाठीही ग्रीन टी फायद्याची मानली जाते. इतकेच नाही तर ग्रीन टीमुळे त्वचेलाही अनेक फायदे होता. पण याचीही एक दुसरी बाजू म्हणजे ग्रीन टी चे जास्त सेवन केल्याने याने नुकसानही होतात.
जेवणानंतर लगेच पिणं टाळा
जास्तीत जास्त लोकांचा सर्वात मोठा गैरसमज असतो की, जेवणानंतर लगेच ग्रीन टी प्यायल्याने जेवणामधून शरीराला मिळालेल्या कॅलरीज दूर होण्यास मदत होते. परंतु, या गोष्टीमध्ये काहीही तथ्य नाही आणि ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. जेवण जेवल्यानंतर त्यातील प्रोटीन पचण्यासाठी वेळ लागतो. अशातच जर तुम्ही जेवणानंतर लगेच ग्रीन टीचं सेवन केलतं तर पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून जेवणानंतर लगेच ग्रीन टी पिणं टाळा.
लक्षात ठेवा ग्रीन टी जास्त गरम असू नये...
अनेक लोक अशी असतात ज्यांना फार गरम चहा प्यायला आवडतो. कपामध्ये घेतात आणि लगेच पितातही. परंतु ग्रीन टीबाबत असं करणं टाळा. जास्त गरम ग्रीन टी प्यायल्याने त्याची चव बिघडते आणि यामुळे घशासोबतच पोटालाही त्रास होतो. ग्रीन टी पिण्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून कोमट पाण्यामध्ये ग्रीन टीचं सेवन करा.
ग्रीन ची उकळताना त्यामध्ये मध एकत्र करू नका
अनेक लोक ग्रीन टी जास्त हेल्दी करण्यासाठी त्यामध्ये मध एकत्र करून पितात. परंतु, जसं जास्त गरम ग्रीन टी पिणं आरोग्यासाठी नुकसानदायी आहे. तसचं ग्रीन टी उकळताना त्यामध्ये मध एकत्र केल्याने त्याची न्यूट्रिशनल वॅल्यू कमी होते. अशातच जेव्हा ग्रीन टीचं टेम्परेचर थोडं कमी होतं तेव्हा त्यामध्ये मध आणि दालचिनी एकत्र करून पिऊ शकता.
औषधांसोबत ग्रीन टी पिणं टाळा
अनेक लोक सकाळी औषधांसोबत पाण्याऐवजी ग्रीन टी घेतात. असं अजिबात करू नका. असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. औषधांचं केमिकल कॉम्पोजिशन, ग्रीन टीसोबत एकत्र होऊन त्यामुळे अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. त्यामुळे औषधं घेण्यासाठी ग्रीन टी नाहीतर पाण्याचा वापर करा.
आर्टिफिशिअल फ्लेवर एकत्र करू नका
बाजारामध्ये सध्या लोकांची आवड लक्षात घेऊन ग्रीन टीचे अनेक फ्लेवर्स उपलब्ध आहेत. अनेक ग्रीन टीमध्ये विक्री वाढविण्यासाठी त्यांमध्ये आर्टिफिशिअल फ्लेवर्स एकत्र करण्यात आले आहेत. हे आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायी ठरतं. त्यामुळे नॅचरल फ्लेवर्स असणाऱ्या ग्रीन टीचं सेवन अत्यंत फायदेशीर ठरतं.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)