आयुर्वेदिक जडीबुटींपासून बनवा 'हा' खास चहा, आतड्यांची होईल सफाई अन् वजनही होईल कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 03:29 PM2024-10-29T15:29:27+5:302024-10-29T15:50:26+5:30

Herbal Tea : हिवाळ्यात सतत होणाऱ्या या समस्या टाळायच्या असतील तर आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे.

Ayurvedic tea to reduce acid reflux, maintain sugar levels and blood pressure | आयुर्वेदिक जडीबुटींपासून बनवा 'हा' खास चहा, आतड्यांची होईल सफाई अन् वजनही होईल कमी!

आयुर्वेदिक जडीबुटींपासून बनवा 'हा' खास चहा, आतड्यांची होईल सफाई अन् वजनही होईल कमी!

Herbal Tea : आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. पोटात विषारी पदार्थ जमा होऊन पोटासंबंधी अनेक गंभीर समस्या होतात. इतकंच नाही तर शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्याने आतड्या तर खराब होतातच, सोबतच वजन वाढतं. ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरही असंतुलित होते. 

सध्या थंडीचे दिवस आहे आणि वातावरण बदलत आहे. ज्यामुळे सहजपणे कुणालाही सर्दी, खोकला, ताप, अस्थमा अशा समस्या होतात. हिवाळ्यात सतत होणाऱ्या या समस्या टाळायच्या असतील तर आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे. या उपायाने पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि अनेक आजारांचा धोकाही टळेल.

आयुर्वेदिक चहासाठी साहित्य

१ चमचा बडीशेप, जिरे आणि धणे

१ चमचा वाळलेल्या/ताज्या गुलाबाच्या पाकळ्या

२ अपराजिता

७ ते १० कढीपत्ते

५ पदीन्याची पाने

एक तुकडा आले

४ तुळशीची पाने

कसा बनवाल हा चहा?

वर सांगण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी एक ग्लास पाण्यात उकडून घ्या. ५ ते ७ मिनिटे मध्यम आसेवर उकडू द्या. नंतर गाळून याचं सेवन करू शकता.

काय होतात फायदे?

हा आयुर्वेदिक चहा अ‍ॅसिडिटी, अ‍ॅसिड रिफ्लक्स, गॅस्ट्रायटिस, सूज कमी करण्यास मदत मिळते. तसेच हार्मोन संतुलन, इन्सुलिन संवेदनशीलता, थायरॉइड, केस आणि त्वचेसाठीही याने फायदा मिळतो.

बीपी आणि ब्लड शुगर कंट्रोल

या चहाने पिंपल्सची समस्या दूर होते, भूक कंट्रोल होते, ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं आणि पोटावरील चरबी कमी करण्यासही मदत मिळते. तसेच मळमळ कमी होते व वात-पित्त-कफही संतुलित राहतो.

आयुर्वेदिक चहा पिण्याची वेळ

हा आयुर्वेदिक चहा पिण्याची योग्य सकाळी रिकाम्या पोटी आहे. तसेच तुम्ही जेवण केल्यानंतर ३० ते ४५ मिनिटांनी सुद्धा या चहाचं सेवन करू शकता.

Web Title: Ayurvedic tea to reduce acid reflux, maintain sugar levels and blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.