वजन कमी करण्यासाठी 'बनाना टी' करेल मदत; असा करा तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:01 PM2019-09-20T17:01:48+5:302019-09-20T17:14:31+5:30
चहा म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. हा एक पेय पदार्थ नसून अनेकांच्या इमोशन्सचा विषय असतो. कामाच्या ताणामध्ये एक कप चहा मिळाणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. यातील गमतीचा विषय म्हणजे, अनेक लोकांना चहा आवडतो पण कसला चहा आवडतो.
चहा म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. हा एक पेय पदार्थ नसून अनेकांच्या इमोशन्सचा विषय असतो. कामाच्या ताणामध्ये एक कप चहा मिळाणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. यातील गमतीचा विषय म्हणजे, अनेक लोकांना चहा आवडतो पण कसला चहा आवडतो, यामध्ये ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे. तुम्हीही आतापर्यंत चहाचे वेगवेगळे प्रकार ऐकले असतील. ज्यांमध्ये हर्ब्स, फूलं यांसारखे पदार्थ एकत्र केले जातात. पण एक असाही चहा आहे जो केळ्यापासून तयार करण्यात येतो. याच चहाला बनाना टी असंही म्हटलं जातं.
काय आहे बनाना टी?
नैसर्गिक गुणांनी भरपूर केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व असतात. जे आपल्याला अनेक समस्यांपासून वाचवतात. केळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं. त्याचबरोबर ब्लड प्रेशर योग्य असणं, फुफ्फुसांच्या समस्या दूर करणं आणि अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव करण्याचंही काम करतो. या सर्व समस्यांव्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठीही केळ्याचा चहा मदत करतो.
केळ्याच्या चहाचे फायदे
केळ्याचा चहाची खासियत म्हणजे, यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, मॅग्नीज आणि व्हिटॅमीन बी 6 यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, केळी आणि चहा यांमधील दोन्ही गुणधर्मांमुळे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर बनाना टी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, पोटॅशिअम, ल्यूटिन आणि अनेक अॅन्टीऑक्सिडंट असतात. या पोषक तत्वांमध्ये मेटाबॉलिज्म वाढतं आणि तुम्हाला जास्त भूकही लागणार नाही.
असा तयार करा बनाना टी
बनाना टी तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये एक केळं उकळून घ्या. तुम्ही साल काढूनही केळं उकळून घेऊ शकता. गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. त्यानंतर ब्लॅक टी किंवा ग्रीन टी एकत्र करून घ्या. तुमची बनाना टी तयार आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)