वजन कमी करण्यासोबतच तणावही दूर करतो केळ्याचा चहा; कसा कराल तयार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 03:14 PM2019-04-23T15:14:44+5:302019-04-23T15:19:50+5:30

केळ्याचं सेवन आपण दररोज करतो. पण तुम्ही कधी केळ्याचा चहा प्यायला आहे का? ऐकून विचित्र वाटलं असेल ना? पण केळ्याचा चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

Banana tea is healthy for health it can reduce weight and stress level health benefits of banana tea | वजन कमी करण्यासोबतच तणावही दूर करतो केळ्याचा चहा; कसा कराल तयार 

वजन कमी करण्यासोबतच तणावही दूर करतो केळ्याचा चहा; कसा कराल तयार 

Next

(Image Credit : organicfacts.net)

केळ्याचं सेवन आपण दररोज करतो. पण तुम्ही कधी केळ्याचा चहा प्यायला आहे का? ऐकून विचित्र वाटलं असेल ना? पण केळ्याचा चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. केळ्यापासून आपण हर्बल टी तयार करू शकतो. जो आरोग्यासाठी इतर हर्बल चहाप्रमाणेच फायदेशीर ठरतो. केळ्याच्या चहामध्ये व्हिटॅमिन्स, पोटॅशिअम, मिनरल्स इत्यादी मुबलक प्रमाणात असतात. ज्यांना पोटाच्या समस्या आणि झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी केळ्याचा चहा गुणकारी ठरतो. जाणून घ्या केळ्याचा चहा तयार करण्याची पद्धत आणि फायदे... 

असा तयार करा चहा 

केळ्याचा चहा तयार करण्यासाठी एक केळं, एक कप पाणी आणि दालचिनी पावडर या पदार्थांची गरज लागणार आहे. पाण्यामध्ये थोडीशी दालचिनी पावडर एकत्र करून उकळून घ्या. पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर त्यामध्ये केळ्याची साल काढून त्याचे तुकडे एकत्र करा. थोडा वेळ उकळल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण गाळून घ्या आणि कोमट झाल्यानंतर पिऊन टाका. 

केळ्याच्या चहाचे फायदे :

तणाव होतो दूर 

वाढता कामाचा ताण आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच डोक शांत ठेवण्यासाठी केळ्याच्या चहाचे सेवन करा. सर्व थकवा आणि तणाव दूर होतो. या चहाचा थेट परिणाम मेंदूवर होतो. याचं नियमित सेवन केल्याने तुम्हाला लगेच तणावापासून सुटका मिळण्यास मदत होते. 

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी 

केळ्याचा चहा हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्यामुळे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर नियमितपणे केळ्याच्या चहाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. 

वजन होइल झटपट कमी 

वाढत्या वजनाच्या समस्येमुळे लोक फार वैतागलेली असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. अशातच प्रत्येक दिवशी चहाचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये ल्यूटिन आणि व्हिटॅमिन ए, बी आणि पोटॅशियम अधिक असल्यामुळे वजन झटपट कमी होण्यास मदत होते. 

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी 

केळ्यापासून तयार करण्यात आलेल्या चहामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम तसेच अॅन्टीऑक्सिडंट असतात. पोटाच्या समस्यांमध्येही हे अत्यंत लाभदायी ठरतं. अॅसिडीटी, अपचन किंवा पोटदुखी यांसारख्या समस्यांमुळे त्रासलेले असतात. त्यांच्यासाठीही केळ्याचा चहा पोटदुखी आणि गॅसच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Banana tea is healthy for health it can reduce weight and stress level health benefits of banana tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.