#BappachaNaivedya : असे ब्रेडचे गुलाबजाम करा की, खव्याची आठवणही येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 04:16 PM2018-09-20T16:16:11+5:302018-09-20T16:18:06+5:30
आम्ही देत आहोत सोपे, पटकन होणारे आणि खवा न वापरताही खव्यासारख्या लागणाऱ्या गुलाबजामची रेसिपी
गुलाबजाम आवडत नाही अशी व्यक्ती मिळणे अवघडंच ! पण प्रत्येकवेळी गुलाबजाम करण्यासाठी खवा मिळेलच असं नाही. मग मैद्याचे गुलाबजाम करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. पण काहीवेळा तेही गुलाबजाम पाकात टाकल्यावर फुटतात आणि ऐन कार्यक्रमात मनस्ताप सहन करावा लागतो. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी आम्ही देत आहोत सोपे, पटकन होणारे आणि खवा न वापरताही खव्यासारख्या लागणाऱ्या गुलाबजामची रेसिपी.तेव्हा या पद्धतीने गुलाबजाम नक्की करून बघा.
साहित्य :
- ब्रेड स्लाईस १० ते १२
- दूध अर्धी वाटी
- साखर दीड वाटी
- दूध पावडर एक चमचा
- वेलची पूड
- पाणी
- तळण्यासाठी तेल
कृती :
ब्रेडच्या कडा काढून त्यात एक लहान चमचा दूध पावडर, दूध आणि आवश्यक असल्यास पाणी घालून मळावे.
हा गोळा घट्ट मळावा.आणि त्याचे लहान लहान गोळे करून घ्यावेत.
दोन वाटी पाण्यात साखर घालून एक तारी पाक करून घ्यावा. या पाकात स्वादासाठी अर्धा चमचा वेलची पूड टाकावी.
तेल तापवून घ्यावे. त्यानंतर गॅस कमी करून तयार गोळे सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत.
गोळे तळताना सगळे एकदम टाकण्याची घाई करू नये, गुलाबजाम कच्चे राहू शकतात.
एक सारख्या आचेवर तळताना जळण्याची शक्यता कमी होते.
तयार गोळे पाकात टाकून दोन तास मुरू द्यावे. ब्रेडचे गुलाबजाम तयार.