जवसाचं पाणी वजन कमी करण्यासाठी आणि ब्लडप्रेशरसाठी ठरतं फायदेशीर, जाणून घ्या कसं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:30 AM2019-12-31T10:30:37+5:302019-12-31T10:33:30+5:30

दिवसेंदिवस बदलत जाणारे वातावरण तसंच धकाधकीचे आयुष्य आणि जीवन जगण्याची पध्दत यांच्यात ताळमेळ न राहिल्याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो.

barley water is beneficial for weight loss and for blood pressure | जवसाचं पाणी वजन कमी करण्यासाठी आणि ब्लडप्रेशरसाठी ठरतं फायदेशीर, जाणून घ्या कसं

जवसाचं पाणी वजन कमी करण्यासाठी आणि ब्लडप्रेशरसाठी ठरतं फायदेशीर, जाणून घ्या कसं

Next

दिवसेंदिवस बदलत जाणारे वातावरण तसंच धकाधकीचे आयुष्य आणि जीवन जगण्याची पध्दत यांच्यात ताळमेळ न राहिल्याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. तसंच यामुळे आयुष्यावर नकारात्मक परीणाम होत असतो. जेव्हा लहान मोठ्या आरोग्याच्या कुरबूरी सुरू असतात तेव्हा प्रत्येकवेळी दवाखान्यात जाणं शक्य नसतं.  खाण्यापिण्याच्या अनियमितेमुळे वजन वाढत जातं. आणि एकदा वजन वाढलं तर ते कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. 

अनेकदा कामामुळे व्यायाम  करण्यासाठी वेळ मिळत नाही तसंच डाएट  करण्यासाठी योग्य आहार सुध्दा घेतला जात नाही. अशावेळी वजन कमी करण्याच्या आणि आजारांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात प्रत्येकजण असतो. तुम्हाला सुध्दा हीच समस्या जाणवत असेल तर अत्यंत कमी पैशात उपलब्ध असलेल्या आणि घरगुती वापरातील एका पदार्थांचा वापर करून तुम्ही आपलं आरोग्य व्यवस्थीत ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया  जवस या पदार्थाचा वापर करून कशाप्रकारे तुम्हाला ब्लडप्रेशरची तसंच लठ्ठपणाची समस्या दूर ठेवता येईल.

तुम्हाला माहितही नसेल पण जवस या पदार्थाचा वापर करून तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. जवसेचे सेवन केल्यास पोट भरल्याची जाणीव होते. तसंच बराचवेळ भूक लागण्याची जाणीव होत नाही. जवसेचे पाणी पिऊन तुम्ही वजन कमी करू शकता. 


 

जवसाचे पाणी कसं तयार करायचं

त्यासाठी  अर्धा लिटर पाणी गरम करा. पाण्याला उकळ आल्यानंतर त्यात अर्धा कप जवस घाला, त्यासोबत त्यात दालचीनीचा एक तुकडा घाला . आणि ३० मिनिटं उकळत ठेवा. त्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या. या पाण्याची चव वाढवण्यासाठी त्यात मध आणि लिंबू घाला. दिवसातून २ वेळा या पाण्याचं सेवन करा.

जवसाच्या पाण्याचे फायदे

या पाण्यामुळे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. हृदयाला रक्तपूरवठा सुरळीत  होतो. 

शरीरातील टॉक्जीन्स काढून टाकण्यास फायदेशीर ठरते.

या पाण्यात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट्स आणि व्हिटामीन्स असतात.

आर्यन, मॅन्गनीज यांसारखे शरीराला आवश्यक असणारे घटक असतात.

शरीरातील एक्सट्रा फॅट निघून जाण्यास हे पाणी फायदेशीर ठरतं.

Web Title: barley water is beneficial for weight loss and for blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.