उन्हाळ्यात सुपर फूड ठरतं हे पारदर्शी फळ; एकदा नक्की खाऊन पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 04:32 PM2019-04-30T16:32:12+5:302019-04-30T16:35:44+5:30

आपल्याला सर्वांना लिची माहीतचं आहे. लिची शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. साधारणतः लिचीप्रमाणे दिसणारं आणखी एक फळ आहे. जे फक्त उन्हाळ्यातच येतं. ते म्हणजे, ताडगोळा. ताडगोळा निसर्गतःच थंड असतो.

To beat the heat eat tadgola or ice apple know tadgola health benefits | उन्हाळ्यात सुपर फूड ठरतं हे पारदर्शी फळ; एकदा नक्की खाऊन पाहा

उन्हाळ्यात सुपर फूड ठरतं हे पारदर्शी फळ; एकदा नक्की खाऊन पाहा

googlenewsNext

आपल्याला सर्वांना लिची माहीतचं आहे. लिची शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. साधारणतः लिचीप्रमाणे दिसणारं आणखी एक फळ आहे. जे फक्त उन्हाळ्यातच येतं. ते म्हणजे, ताडगोळा. ताडगोळा निसर्गतःच थंड असतो. त्यामुळेच याला आइस अ‍ॅपल असंही म्हटलं जातं. उन्हाळ्यामध्ये याचं सेवन करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. ताडगोळा दिसायला एखाद्या व्हाइट जेलीप्रमाणे दिसत असून त्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर असतं. एवढचं नाही तर यामध्ये पोषक तत्व आणि पाणी मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे हे खाल्याने शरीर हायड्रेट होतं. तसेच याच्या सेवनाने इम्युनिटी सिस्टम मजबुत होण्यासही मदत होते. 

कुठे मिळतं हे फळं?

उन्हाळ्यामध्ये ताडगोळा जास्तकरून भारताच्या किनाऱ्यालगतच्या क्षेत्रांमध्ये आढळतो. म्हणजेच, महाराष्ट्रातील कोकण, गोवा आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आढळून येते. उन्हाळ्यामध्ये हे फळ शरीराला थंडावा देण्यासाठी मदत करतं. तसेच उन्हाळ्यामुळे होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवण्याचं कामही करतं. 

शरीरासाठी पोषक असण्यासोबतच पोषक तत्त्वांनी भरपूर :

- ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 12, आयर्न, पोटॅशिअम, झिंक, फॉस्फरस आणि कॅल्शिअम आढळून येतं. ही सर्व पोषक तत्व शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. खनिजं आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असलेलं हे फळं डायबिटीजच्या रूग्णांसाठी अत्यंत आवश्यक असतं. 

ताडगोळा खाण्याचे फायदे :

- उन्हाळ्यामध्ये हे फळ शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं आणि शरीराला थंडावा देतं. डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठीही हे फळं अत्यंत फायदेशीर ठरतं. या फळापासून तयार केलेला ज्यूस दररोज सकाळी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. 

- ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 आढळून येतं. जे अॅसिडीटी पासून सुटका करण्यासाठी मदत करतं. 

- हाय कॅलरी असल्यामुळे ताडगोळ्याचे सेवन उन्हाळ्यामध्ये शरीराला जाणवणारी अस्वस्थता आणि थकवा दूर होतो. हे फळ इन्स्टंट एनर्जी लेव्हल वाढविण्यासाठी मदत करतं. 

- गरोदर महिलांना सतावणाऱ्या वद्धकोष्ट किंवा अॅसिडीटीसारख्या समस्या दूर करण्यासाठी हे फळ मदत करतं. पण याचे सेवन करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

- ताडगोळ्यामध्ये पोटॅशिअम जास्त असतं कारण हे लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आणि बॉडि डिटॉक्स करण्यासाठी मदत करतं. 

- मासिक पाळीदरम्यान व्हाइट डिस्चार्जची समस्या वाढते. ही समस्या कमी करण्यासाठी ताडगोळ्याचं सेवन करा. यामध्ये अस्तित्वात असणारं कॅल्शिअम आणि फॉस्फरस या समस्यांपासून सुटका करण्यासाठी मदत करतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. आपली प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: To beat the heat eat tadgola or ice apple know tadgola health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.