वजन कमी करणे आणि शरीरात रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर आहे हा नाश्ता, जाणून घ्या रेसिपी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 04:21 PM2024-08-08T16:21:12+5:302024-08-08T16:55:31+5:30
Beetroot Idli Recipe: नेहमीच इडली खाऊन कंटाळा आला असेल तर ही हेल्दी आणि आरोग्याला फायदेशीर वेगळी इडली नक्कीच तुम्हाला आवडले.
Beetroot Idli Recipe: सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. सकाळच्या नाश्त्यामुळे दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते. अशात नाश्ता हा पौष्टिक आणि पोटभर केला पाहिजे. तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि तुम्हाला हेल्दी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही बिटाची इडली ट्राय करू शकता. नेहमीच इडली खाऊन कंटाळा आला असेल तर ही हेल्दी आणि आरोग्याला फायदेशीर वेगळी इडली नक्कीच तुम्हाला आवडले.
बिटामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. तसेच यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. इतकंच नाही तर यात व्हिटॅमिन सी आणि आयर्नही भरपूर असतं. ज्यामुळे शरीरात लाल रक्तपेशी वाढण्यास मदत मिळते. तसेच याने शरीराचा वेगवेगळ्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. इतकंच नाही तर बीट हे एक नॅचरल प्यूरिफायर सारखंही काम करतं. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. अशात चला जाणून घेऊ कशी बनवाल बिटाची इडली.
बिटाची इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही बीट हिरव्या मिरच्या आणि आल्यासोबत बारीक करून घ्या. याची मुलायम पेस्ट तयार व्हायला हवी. नंतर एका वाट्यामध्ये बिटाची पेस्ट, सोजी, दही आणि मीठ टाका. हे चांगलं मिक्स करून घ्या आणि घट्ट बॅटर तयार करा. काही वेळासाठी ते तसंच राहू द्या.
आता तुम्हाला एक तडका तयार करायचा आहे. एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात राई, उडीद डाळ, कापलेला कांदा आणि कढीपत्ते टाका. हा तयार तडका बॅटरमध्ये टाका. थोडं फ्रूट सॉल्ट टाका आणि चांगलं मिक्स करा. इडलीच्या भांड्यात बॅटर टाका आणि १० मिनिटे स्टिम करा. बिटाची इडली तयार आहे. ही तुम्ही सांबार आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.