हिवाळ्यात ओव्याचं सेवन कराल तर.. 'ही' समस्या नक्की होईल दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 03:29 PM2019-11-29T15:29:49+5:302019-11-29T15:47:57+5:30
ओवा हा रोजच्या वापरात असणारा पदार्थ आहे. आणि याचा वापर फक्त जेवणासाठी होत नसून आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
ओवा हा रोजच्या वापरात असणारा पदार्थ आहे. आणि याचा वापर फक्त जेवणासाठी होत नसून आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. पोटाच्या विकारापासून मुक्तता मिळवण्यासाठी ओवा उपयुक्त ठरतो. मसाल्याचा पदार्थ म्हणून ओवा हा उत्तम आहे. तसचं ओव्याचे काही औषधी गुण सुध्दा आहेत. ओव्याच्या सेवनाने मधुमेह, रक्तदाब यांसारखे मोठे आजारांना दूर ठेवता येते.
पुर्वीपासुनच ओवा हा विविध आजांरापासुन सुटका मिळवण्यासाठी वापरला जातो. तसेच स्वयंपाकघरात ओव्याचे वेगळे स्थान आहे. अनेक पदार्थांमध्ये ओवा वापरला जातो. कारण त्यामुळे पदार्थाला वेगळीच चव येते. भजी, वडे, पराठे अश्या अनेक पदार्थांमध्ये पचनासाठी ओवा वापरला जातो. ओव्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याने प्रत्येकाच्या घरी ओवा असतो. कारण ओव्यामुळे अनेक समस्या घरीच दूर करता येतात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओवा खाल्ल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. कारण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत खाण्यापिण्यावर नियंत्रण नसल्यामुळे पोटात दुखणे ,पोट साफ न होणे. अश्या समस्या उद्भवत असतात जेवण झाल्यावर अन्न पचन होण्यासाठी ओवा खातात. मुखवासासाठी बडीशेप, लवंग, वेलदोडाप्रमाणेच बऱ्याचदा ओवा देखील वापरण्यात येतो. ओव्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज स्वयंपाकात ओव्याचा वापर करा. जेवणानंतर ओवा खाण्याने तुमच्या पचनक्रियेमध्ये हळूहळू सुधार होऊ शकतो.
अनेकदा आपण खुप भुक लागल्याने आपण जास्त जेवतो. जेवण झाल्यास अपचनाचा त्रास होतो. अपचनामुळे पोटात गॅस झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागतं. अशा वेळी ओवा तव्यावर तुपात भाजून तो कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरीत आराम मिळेल. कारण ओव्याने तुमच्या पोटातील गॅस लगेच कमी होतो. ओव्यामुळे सांधेदुखीच्या समस्या कमी होण्यास मदत होते. याचबरोबर ओव्यात अॅन्टीबायोटिक घटक असल्याने त्वचेचे विकार, खाज येणे किंवा त्वचा लालसर होणे. यांसारख्या त्वचेच्या समस्यांपासुन आराम मिळतो.