आरोग्य राखण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत; बेसनाच्या कढीचे फायदेच फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 11:28 AM2019-11-04T11:28:37+5:302019-11-04T11:29:18+5:30

उत्तर भारतात बेसनाची कढी शुभ मानली जाते. एवढचं नाहीतर उत्सवासाठी प्रसाद म्हणूनही बेसनाची कढी तयार केली जाते. महाराष्ट्रातही हा पाहुण्यापदार्थाचा अनेकांनी स्विकार केला असून मोठ्या चविने या पदार्थाचा आहारात समावेश केला जातो.

Benefits of besan kadhi for health and beauty | आरोग्य राखण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत; बेसनाच्या कढीचे फायदेच फायदे!

आरोग्य राखण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत; बेसनाच्या कढीचे फायदेच फायदे!

Next

उत्तर भारतात बेसनाची कढी शुभ मानली जाते. एवढचं नाहीतर उत्सवासाठी प्रसाद म्हणूनही बेसनाची कढी तयार केली जाते. महाराष्ट्रातही हा पाहुण्यापदार्थाचा अनेकांनी स्विकार केला असून मोठ्या चविने या पदार्थाचा आहारात समावेश केला जातो. पण तुम्हाला एक गंमत माहीत आहे का? फक्त उत्सवातच नाहीतर या कढीच्या चवीमुळे हा पदार्थ अनेक लोकांच्या आवडीचा पदार्थ बनला आहे. यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्याचबरोबर शरीराचे फंक्शन्स आणि ग्रोथसाठी उत्तम असते. या पदार्थमध्ये प्रोटीन्स, कॅल्शिअम्स, फॉस्फरसही मोठ्या प्रमाणावर असतात. जर तुम्हाला कढी आवडत असेल तर जाणून घ्या आरोग्यदायी फायदे... 

अनिमियाच्या पेशंट्ससाठी उत्तम 

कढीमध्ये आयर्न आणि प्रोटीन्स मुबलक प्रमाणात असतात. जे हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उत्तम कॉम्बिनेशन आहे. 

स्किन आणि केसांसाठी उत्तम 

बेसन कोलेजन वाढवतं आणि यामध्ये अन्टी-इन्फ्लेमेट्री गुणधर्म असतात. यामुळे अॅक्ने डार्क स्पॉट्स आणि त्वचेच्या इतर समस्या दूर होतात. 

गरोदर महिलांसाठी उत्तम असते कढी 

गरोदर महिलांनी कढी खाणं अत्यंत आवश्यक असतं. यामध्ये फोलिएट, व्हिटॅमिन बी6 आणि आयर्न होते. ही कढी बाळाच्या आरोग्याच्या वाढीसाठी मदत करते. 

पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी

बेसनाच्या कढीमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे पोटासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे अन्ननलिकेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. तसेच यातील पोषक तत्व पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत करतात. 

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी 

कढीमध्ये मॅग्नशिअम असतं. जे मसल्स रिलॅक्स करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. फॉस्फरस लिपिड मॅकॅनिजन योग्य प्रमाणात राखण्यासाठी मदत करतात. 

रक्तातील सारख नियंत्रणात राहते

कढीमधील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं, त्यामुळे ही डायबिटीसने ग्रस्त असणाऱ्या लोकांसाठी उत्तम ठरतं. 

वजन कमी करते

बेसनाच्या कढी तायर करण्यासाठी बेसन आणि ताकाचा वापर केला जातो. बेसनामध्ये गुड फॅट्स आणि प्रोटीन असतात. यामध्ये कॉम्प्लॅक्स कार्बोहायड्रेट, फोलेट असतात. त्याचबरोबर याचंही ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं. त्यामुळे जर पुढच्या वेळी तुमच्या समोर बेसनाची कढी असेल तर कोणताही विचार न करता अगदी चविने फस्त करा. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Web Title: Benefits of besan kadhi for health and beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.