सुकलेला लसूण टाकून देताय?; असं करू नका, फायदे वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 12:42 PM2019-10-27T12:42:00+5:302019-10-27T12:47:37+5:30
लसणाचे आरोग्यदायी फायदे आपल्या सर्वांना माहीतच आहेत. आयुर्वेदातही लसणाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यवर्धक फायदे सांगण्यात आले आहेत. पण लसणाच्या पाकळ्या सुकतात. त्यावेळी आपल्याला वाटतं की, त्या खराब होत आहेत.
लसणाचे आरोग्यदायी फायदे आपल्या सर्वांना माहीतच आहेत. आयुर्वेदातही लसणाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यवर्धक फायदे सांगण्यात आले आहेत. पण लसणाच्या पाकळ्या सुकतात. त्यावेळी आपल्याला वाटतं की, त्या खराब होत आहेत. पण सुकलेला लसूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. अनेकदा आपण हा लसूण खराब समजून टाकून देतो. जर तुमच्या घरामध्ये असलेला लसण जर सुकला तर तो टाकून देऊ नका. तो लसून जेवण तयार करण्यासाठी किंवा चटणी तयार करण्यासाठी वापरा.
सुकलेल्या लसणाचे फायदे वाचून तुम्हीही अवाक् व्हाल. काळा लसूण किंवा सुकलेला लसूण ब्लड सर्क्युलेशन वाढविण्याचं काम करतो. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचा स्तर घटतो. काळ्या लसणाच्या सेवनाने आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत होते. खोकला, सर्दी आणि तापापासून बचाव करण्यासाठी काळा लसूण किंवा सुकलेला लसूण फायदेशीर ठरतो. तसेच हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतं.
अनेक लोक डायबिटीसच्या समस्येने त्रस्त असतात. त्यांच्यासाठी काळा लसूण अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर बॅक्टेरिया आणि फंगसमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो. कारण काळ्या लसणामध्ये अॅन्टीबॅक्टेरियल, अॅन्टीवायरल आणि अॅन्टीफंगल प्रॉपर्टिज असतात. काळ्या लसणामध्ये हे सारे गुणधर्म असतात. याव्यतिरिक्त ब्लॅक गार्लिकमध्ये फर्मनटेशनमुळे जे अॅन्टीऑक्सिडंट तयार होतात. ते यूनिक असतात. हे पॉलिफिनॉल्स, फ्लवोनॉइड्स आणि अल्केलॉइड्सही भरपूर असतात.
सुकलेल्या लसणामधील हे गुणधर्म कॅन्सरवर गुणकारी असतात. यामुळे अॅलर्जी दूर होते. मेटाबॉलिजम सुधारते. लिव्हर डॅमेज होण्यापासून बचाव होतो. तसेच मेंदूचं आरोग्य राखण्यासाठीही उत्तम असतं. त्यामुळे कधीही स्वयंपाक घरातील लसूण फेकण्याची चूक करू नका.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)