डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी काजू खाणं फायदेशीर ठरतं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 12:51 PM2019-09-21T12:51:14+5:302019-09-21T12:51:27+5:30
डायबिटीजमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही हेल्दी डाएट घेत नसाल तर ब्लड शुगर लेव्हल वाढू लागते. अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, डायबिटीज रूग्णांसाठी रूग्ण ड्रायफ्रुट्सचं सेवन करू शकतात.
डायबिटीजमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही हेल्दी डाएट घेत नसाल तर ब्लड शुगर लेव्हल वाढू लागते. अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, डायबिटीज रूग्णांसाठी रूग्ण ड्रायफ्रुट्सचं सेवन करू शकतात. पण काजू खावं की नाही? याबाबत अनेक लोक संभ्रमात असतात की, डायबिटीजमध्ये काजूचं सेवन करणं फायदेशीर ठरतं की नाही? काजूबाबत करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, डायबिटीस असणाऱ्यांनी काजू खाल्लाने इन्सुलिनचा स्तर वाडविण्यासोबतच ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीही फायदा होतो.
काजू खाल्याने डायबिटीसमध्ये होणारे फायदे :
मोलेक्यूलर न्यूट्रीशन अॅन्ड फूड रिसर्चमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, काजू खाण्याने इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. काजू खाल्याने शरीरातील स्नायूंमध्ये साखर शोषून घेण्याची क्षमता वाढते.
शरीरातील इन्सुलिन तयार होण्याची क्षमता वाढविण्यासाठी काजूमध्ये अनेक पोषक तत्व आढळून येतात. जे डायबिटीसचा धोका कमी करतात. जर तुम्हाला डायबिटीस नसेल तर काजूचं सेवन डायबिटीसपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
डायबिटीसमध्ये काजू का फायदेशीर ठरतात?
जेव्हा डायबिटीस असणाऱ्यांसाठी डाएट प्लॅन तयार केला जातो. तेव्हा त्यामध्ये अशा पदार्थांचा समावेश करण्यात येतो. ज्यांचं कमी प्रमाणात सेवन केल्यानेही शरीराला जास्त ऊर्जा मिळते. शरीराला ऊर्जा देण्यासोबतच त्यांमध्ये साखरेचे प्रमाणही कमी असतं. अशातच काजूचे 2 ते 4 तुकडेही ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी फायदेशीर ठरतात.
काजू खाल्याने डायबिटीस असणाऱ्या रूग्णांनाही सतत भूक लागत नाही. काजूमध्ये असणारी पोषक तत्व शरीरामध्ये इन्सुलिनचा स्तर वाढवतात.
काजू खाण्याचे फायदे
जर आरोग्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर काजू खाण्याचे अनेक फायदे आहेत. काजू एक एनर्जी फूड आहे, जे शरीराला काही वेळातच एनर्जी देण्याचं काम करतात. कोलेस्ट्रॉल लेव्हल अनियमित ठेवण्यासाठी काजू अत्यंत फायदेशीर ठरतात. काजू खाल्याने शरीराला प्रोटीन, कॅल्शिअम आणि ओमेगा-3 फॅटी अॅसि़ड मुबलक प्रमाणात असतात.
हाडांच्या मजबुतीसाठीही काजू खाणं अत्यंत फायदेशीर असतं. वाढत्या वयानुसार त्वचेवर येणारी वाढत्या वयाची लक्षणं रोखण्यासाठी काजू खाणं फायदेशीर ठरतं. पचनक्रिया वाढविण्यासाठी काजू ब्रेन हेल्थसाठी उत्तम स्त्रोत आहे. काजूच्या सेवनाने अल्झायमरसारखे आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काजूचं सेवन अत्यंत फायदेशीर ठरतं.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)