मशरूम खाण्याचे फायदे वाचाल तर आवडत नसेल तरी मशरूम खाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 06:04 PM2020-01-20T18:04:26+5:302020-01-20T18:10:21+5:30
अनेकांना मशरूम खायला आवडत नाही. काही जणांना आवडत असतं.
(Image credit- youtube)
अनेकांना मशरूम खायला आवडत नाही. काहीजणांना आवडत असतं. काहीजण घरी असताना मशरून खात नाहीत पण बाहेर कुठेही जेवायला गेल्यावर त्यांना मशरून खावसं वाटत असतं. कारण अनेक पदार्थांना वेगळी चव येण्यासाठी किंवा त्या पदार्थाचे टेक्सचर बदलण्यासाठी मशरूम उपयोगी ठरतं असत. म्हणूनच पिज्जा किंवा बर्गर मध्ये सुद्धा मशरूमचा आवर्जून वापर केला जातो. आज आम्ही तु्म्हाला मशरूमच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही स्वतःच आरोग्य नीट ठेवू शकता.
मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात.
जर तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलं असेल तर आहारात मशरूमचा समावेश करणं फायदेशीर ठरेल. कारण मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात.
ज्यामुळे वजन आणि ब्लड शूगर वाढत नाही.सध्याच्या काळात लोकं कमी श्रम करून लगेच थकतात. म्हणूनच नेहमी तरुण आणि उत्साही राहण्यासाठी मशरुमचे सेवन केले पाहिजे.
मशरूममध्ये केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असे तत्व असतात. कॅन्सरपासून देखील यामुळे बचाव होतो. मशरूमध्ये व्हिटामीन डी असतं. त्यामुले मशरूम खाल्याने हाडांना मजबूती मिळण्यासाठी मदत होते.
मशरूममधील शरीरासासाठी आवश्यक असलेले घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लाभदायक ठरतात.