रोज सकाळी उठल्यानंतर १ वाटी भिजवलेले चणे खाल तर होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 11:10 AM2020-02-17T11:10:45+5:302020-02-17T11:10:50+5:30

तुम्ही पाहीलं असेल की घरातील  वयस्कर लोक सकाळी उठल्यानंतर नाष्त्यासाठी भिजवलेले चणे खातात.

Benefits of eating soaked black chickpeas | रोज सकाळी उठल्यानंतर १ वाटी भिजवलेले चणे खाल तर होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल!

रोज सकाळी उठल्यानंतर १ वाटी भिजवलेले चणे खाल तर होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल!

googlenewsNext

तुम्ही पाहीलं असेल की घरातील  वयस्कर लोक सकाळी उठल्यानंतर नाष्त्यासाठी भिजवलेले चणे खातात.  तर काहीजण जीमवरून आल्यानंतर भिजवलेले चणे खातात. पण तुम्हाला माहीत आहे का रोज भिजवलेले चणे खाण्याचे काय फायदे आहेत.  अनेक पोषक घटक आणि विटामीन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात भिजवलेल्या चण्यांमध्ये असतात. हे चणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. वेगवेगळ्याप्रकारे शरीराला फायदे मिळवून देण्यासाठी चण्यांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत चणे खाण्याचे फायदेे.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रात राहण्यासाठी भिजवलेले चणे फायदेशीर ठरत असतात. प्रोटीन्स फायबरर्स यांसारखे पोषक तत्व भिजवलेल्या चण्यात असतात. त्यामुळे चण्यांचे सेवन केल्याने आजार होण्याचा धोका कमी असतो.

पचनक्रिया

भिजवलेले चणे खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थीत राहते. त्यात फायबर्स मोठ्या प्रमाणावर  असतात. खाल्लेले अन्न पचवण्यासाठी फायबर्स लाभदायक ठरत असतात.  ज्यांना कफची समस्या आहे अशा लोकांनी चणे खाल्ले पाहिजे. चण्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे पोट साफ होतं.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

चण्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएट करण्याच्या विचारात असाल तर चण्यांचा आहारात समावेश करा. तसंच युरीनचा त्रास होत नाही.भिजलेले चणे गुळासोबत खाल्ल्याने वारंवार युरीन जाण्याची समस्या दूर होते. पाईल्सचा त्रास देखील कमी होण्यास मदत होतो.

रक्ताची करमतरता भरून काढते

चण्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म असतात. चणे फक्त रक्त वाढविण्यासाठीच नाहीतर शरीराच्या इतर समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. त्वचा, दातांच्या समस्यांवरही उपायकारक ठरतात. 

कॅन्सरचा धोका होतो कमी

भिजवलेल्या चण्यांचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. चणांमध्ये ब्यूटिरेटचे फॅटी एसिड असते. जे प्रामुख्याने कॅन्सर वाढवत असलेल्या घटकांना संपवण्याचा प्रयत्न करतात. ( हे पण वाचा-२५ ते ३५ वयोगटातील लोक होतात क्रोहन रोगाचे शिकार, जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!)

डोळयांसाठी फायदेशीर

चणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. कारण त्यात β-कैरोटीन तत्व असतात. डोळ्यांच्या नसांना नुकसान पोहोचवण्यापासून वाचवत असतात. त्यामुळे नजर चांगली होते. इतकंच नाही तर गरोदर महिलांसाठी सुद्धा चण्यांचं सेवन उर्जा देण्यासाठी लाभदायक ठरत असतं. ( हे पण वाचा-विणकाम केल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे, महिलांचं टेन्शन 'असं' होईल दूर!)

Web Title: Benefits of eating soaked black chickpeas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.