थंडीमध्ये गुळ आणि शेंगदाणे खाणं ठरतं फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 06:56 PM2018-11-07T18:56:46+5:302018-11-07T18:59:11+5:30

बदलणाऱ्या वातावरणानुसार आपल्या आहारामध्येही बदल करावे लागतात. उन्हाळ्यामध्ये वातावरणातच उष्णता अधिक असते त्यामुळे अशावेळी थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा.

benefits of jaggery and peanut | थंडीमध्ये गुळ आणि शेंगदाणे खाणं ठरतं फायदेशीर!

थंडीमध्ये गुळ आणि शेंगदाणे खाणं ठरतं फायदेशीर!

Next

बदलणाऱ्या वातावरणानुसार आपल्या आहारामध्येही बदल करावे लागतात. उन्हाळ्यामध्ये वातावरणातच उष्णता अधिक असते त्यामुळे अशावेळी थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा. तर थंडीमध्ये वातावरणातील गारवा वाढतो, त्यामुळे गरम पदार्थांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. थंडिमध्ये गुळ आणि शेंगदाणे खाणं फायदेशीर ठरतं. खाण्यासाठी चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही हे लाभदायक ठरतं. 

आरोग्यासाठी फायदेशीर शेंगदाणे

शेंगदाण्यांमध्ये फोलिक अॅसिड, प्रोटीन, चिकटपणा आणि साखर यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. याचं सेवन केल्याने एनीमियाची समस्या दूर होते. याव्यतिरिक्त एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्याचबरोबर हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी शेंगदाण्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. 

Related image

गुळाचे पौष्टिक गुणधर्म 

दररोज 20 ग्रॅम गुळ खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यामध्ये आयर्न, कॅल्शिअम यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. महिलांनी थंडीमध्ये गुळ आणि शेंगदाण्याचं सेवन अवश्य करावं. 

गुळ आणि शेंगदाणे खाण्याचे फायदे :

- मासिक पाळीच्या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी गुळ आणि शेंगदाण्याचं सेवन करणं आवश्यक असतं. त्यामुळे अनेक समस्या दूर होतात. 

- गुळ शेंगदाणे खाल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो. गुळ-शेंगदाणे गरम असल्यामुळे जास्त खाणं टाळावं. 

- शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी गुळ आणि शेंगदाणे खाणं फायदेशीर ठरतं. यामुळे चेहऱ्यावर उजाळा येतो.

- शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतं त्यामुळे अॅसिडिटी आणि बद्धकोष्टसारख्या समस्या दूर होण्यासही मदत होते. 

- प्रोटीन आणि कॅल्शिअम असलेले शेंगदाणे आणि गुळ खाल्यामुळे दात आणि हाडं मजबुत होतात.

Web Title: benefits of jaggery and peanut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.