बद्धकोष्ठता आणि डायबिटीससारखे आजार होतील दूर, 'या' भाजीचं नियमित करा सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:54 AM2024-10-22T11:54:15+5:302024-10-22T11:55:06+5:30

Bottle gourd Benefits : अनेक डॉक्टर आणि डायटिशिअन ही भाजी नियमितपणे खाण्याचा सल्ला देत असतात. या भाजीमध्ये जवळपास 90 टक्के पाणी आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं. 

Bottle gourd cures incurable diseases like constipation and diabetes | बद्धकोष्ठता आणि डायबिटीससारखे आजार होतील दूर, 'या' भाजीचं नियमित करा सेवन!

बद्धकोष्ठता आणि डायबिटीससारखे आजार होतील दूर, 'या' भाजीचं नियमित करा सेवन!

Bottle gourd Benefits : बाजारात बाराही महिने अशा काही बाज्या मिळतात ज्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात. अशीच एक पौष्टिक आणि आरोग्याला खूप फायदेशीर असणारी भाजी म्हणजे दुधी भोपळा. अनेक डॉक्टर आणि डायटिशिअन ही भाजी नियमितपणे खाण्याचा सल्ला देत असतात. या भाजीमध्ये जवळपास 90 टक्के पाणी आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं. 

दुधी भोपळ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. यात व्हिटॅमिन सी, बी, के, ए, ई, आयर्न, पोलेट, पोटॅशिअम, फायबर आणि मॅगनीजसारखे आवश्यक व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची म्हणजे पोट न होण्याची समस्या असेल आणि तुम्हाला डायबिटीस असेल तर या भाजीचं सेवन आवर्जून केलं पाहिजे. 

दुधी भोपळ्याचे फायदे

बद्धकोष्ठता दूर होते

लौकी म्हणजेच दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्यामुळे पोट साफ न होण्याची समस्या दूर करण्यास मदत मिळते. तसेच फायबरने पोटाचं आरोग्यही चांगलं राहतं.

पचन तंत्र चांगलं राहतं

दुधी भोपळ्याने पनच क्रिया चांगली होऊन मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. कारण यात पाणी आणि फायबरचं प्रमाण अधिक असतं. तसेच या भाजीमध्ये कॅलरी कमी असतात, ज्यामुळे पचन चांगलं होण्या मदत मिळते.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

दुधी भोपळा डायबिटीसच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर असतो. कारण यात शुगर नसते आणि फायबर भरपूर असतं. ही डायबिटीसच्या रूग्णांसाठी सगळ्यात चांगल्या भाज्यांपैकी एक मानली जाते. 

वजन कमी करण्यास मदत

जर तुमचं वजन वाढलं असेल आणि कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही या भाजीचं नियमितपणे सेवन केलं पाहिजे. कारण या भाजीने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे सतत भूक लागत नाही. यात कॅलरी कमी असतात, फॅट नसतं. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

कोलेस्ट्रॉल

दुधी भोपळ्याच्या भाजीचं नियमित सेवन केलं तर शरीरातील कोलेस्ट्रॉल सहजपणे कमी होतं. याने कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते. याचा ज्यूस एक आदर्श पेय मानला जातो.

कसं कराल याचं सेवन?

तुम्ही दुधी भोपळ्याचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. तुम्ही याचं भाजी, सूप किंवा पराठ्याच्या रूपात सेवन करू शकता. याच्या ज्यूसने पोट थंड राहतं. 

Web Title: Bottle gourd cures incurable diseases like constipation and diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.