मार्केटमध्ये रंगलीये 'बबल टी' ची चर्चा, जाणून घ्या फायदे आणि खासियत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:29 PM2019-03-29T12:29:05+5:302019-03-29T12:33:50+5:30
आतापर्यंत तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक टी, मिल्क टी, हर्बल टी आणि येलो टी ची नावे ऐकली असतील. यातील काही चहा तुम्ही ट्राय सुद्धा केला असेल.
आतापर्यंत तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक टी, मिल्क टी, हर्बल टी आणि येलो टी ची नावे ऐकली असतील. यातील काही चहा तुम्ही ट्राय सुद्धा केला असेल. पण सध्या मार्केटमध्ये एका चहाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चहाची क्रेझली भलतीच वाढली आहे. या चहाचं नाव आहे बबल टी. भलेही या चहाची चर्चा आता होत असली तरी याची पाळंमुळं बरीच जुनी आहेत. या चहाचा शोध १९८० मध्ये तायवानमध्ये लागला होता, मात्र आता हळूहळू हा चहा जगभरात लोकप्रिय होत आहे.
तुम्हालाही विचार पडला असेल की, या चहाला बबल टी का म्हणतात? तर या चहाला हे नाव त्यातील इन्ग्रेडियन्ट्समुळे दिलं गेलं आहे. या चहाला पर्ल मिल्क असंही म्हटलं जातं. या चहामधील 'बबल'चा अर्थ आहे गोल-गोल जेलीसारखे दाणे. हे दाणे चहामध्ये टाकले जातात. सोबतच यात थोडा बर्फही टाकला जातो.
या चहाची टेस्ट सामान्य चहापेक्षा वेगळी असते आणि टेस्ट यावरही डिपेन्ड असते की, हा चहा तयार करताना कोणत्या फळांचा किंवा सिरपचा वापर करण्यात आला आहे. वेगवेगळ्या फ्लेवरने हा चहा तयार करता येतो. कधी कधी हा चहा थोडा आंबट आणि कडवटही लागतो. अभ्यासकांनुसार, एक कप बबल चहा ज्यात टॅपिओका बॉल्स असतात त्यात २९९ ते ४०० दरम्यान कॅलरी असू शकतात.
आरोग्यासाठी कसा आहे बबल चहा?
बबल टी तुमच्या आरोग्यासाठी चांगला ठरू शकता. पण त्यासाठी तुम्हाला यात योग्य इन्ग्रेडियन्ट्सचा वापर करावा लागेल. वेगळा काही फ्लेवर यात टाकू नका आणि साखरेचाही वापर कमी करा. जास्त साखर टाकल्याने कॅलरीचं प्रमाण वाढतं आणि अधिक कॅलरी असलेल्या ड्रिंकमुळे आरोग्याला हानी होते. १९९० दरम्यान हा चहा पूर्व आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये चांगलाच लोकप्रिय झाला.
बबल टी चा सर्वात लोकप्रिय फ्लेवर म्हणजे ग्रीन टी, ज्यात catechins आणि polyphenols नावाचं अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. याने शरीराची वेगवेगळ्या रोगांसोबत लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती फार वाढते. सोबतच याने थकवा आणि स्ट्रेस दूर होण्यासही मदत मिळते.