वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं कोबीचं सूप; असं करा तयार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 06:33 PM2019-02-26T18:33:18+5:302019-02-26T18:34:20+5:30
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यापैकी अनेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या वजनामुळे अनेकदा शरीराच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो.
(Image Credit : International Vegan)
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यापैकी अनेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या वजनामुळे अनेकदा शरीराच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच मग वजन कमी करण्यासाठी अनेक फंडे वापरण्यात येतात. यापासून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण जिम किंवा डाएट फॉलो करत असतात. जर तुम्हीही त्यांच्यापैकीच असाल आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही हेल्दी आयडिया सांगणार आहोत. त्यापैकीच एक हेल्दी आयडिया म्हणजे, कोबीचं सूप. मुबलक प्रमाणात पोषक तत्व असल्यामुळे कोबीचं सूप वजन कमी करण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषक तत्व पुरविण्यासाठीही फायदेशीर ठरतं.
कोबीचं सूप फायदेशीर
कोबीचं सूप वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. हे सूप प्यायल्याने लवकर पोट भरतं आणि शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. भाज्यांपासून तयार करण्यात आलेलं सूप प्यायल्याने त्वचाही चमकदार होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये इतर भाज्याही एकत्र करू शकता. जाणून घेऊया कोबीचं सूप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि पद्धत...
साहित्य :
- कोबी
- बारिक चिरलेला कांदा
- टॉमेटो
- शिमला मिरची
- काळी मिरी
- लिंबाचा रस
- मीठ चवीनुसार
कृती :
- सर्वात आधी कोबी आणि टॉमेटो पाण्याने स्वच्छ करून चिरून घ्या.
- आता एक पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये कांदा परतून घ्या.
- कांदा परतल्यानंतर त्यामध्ये कोबी, मीठ एकत्र करून शिजवून घ्या.
- तयार मिश्रणामध्ये 3 ते 4 कप पाणी एकत्र करून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्या.
- आता तयार मिश्रणामध्ये टॉमेटो, काळी मिरी एकत्र करून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्या.
- आता यामध्ये शिमला मिरची 8 ते 9 मिनिटांसाठी शिजवून घ्या.
- सर्वात शेवटी लिंबाचा रस एकत्र करून गॅस बंद करा.
- कोबीचं हेल्दी आणि टेस्टी सूप तयार आहे.
- गरमा गरम सर्व्ह करा कोबीचं सूप.