नाश्ता आणि लंचऐवजी ब्रंच करणं ठरतं फायदेशीर?; जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 03:29 PM2019-03-23T15:29:18+5:302019-03-23T15:33:23+5:30

अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार आणि तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, सकाळचा नाश्ता आपलं आरोग्य उत्तम राख्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दिवसभर एनर्जी मिळण्यास मदत होते.

Can breakfast can replaced by brunch what is called diet expert | नाश्ता आणि लंचऐवजी ब्रंच करणं ठरतं फायदेशीर?; जाणून घ्या 

नाश्ता आणि लंचऐवजी ब्रंच करणं ठरतं फायदेशीर?; जाणून घ्या 

Next

(Image Credit : bordergrill.com)

अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार आणि तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, सकाळचा नाश्ता आपलं आरोग्य उत्तम राख्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दिवसभर एनर्जी मिळण्यास मदत होते. परंतु विकेंडच्या दिवशी जास्तीत जास्त लोक आरामाच्या मूडमध्ये असतात. ते आठवड्याचं थ्री मील डाएट वीकेंडच्या दिवशी फॉलो करू शकत नाहीत. त्यामुळे अनेक लोक या दिवशी हेव्ही ब्रंचचा आधार घेतात. परंतु खरचं ब्रंचपासून पौष्टिक नाश्त्याची भरपाई केली जाऊ शकते का? 

आवश्यक आहे सकाळचा नाश्ता

एक जुनी म्हण आहे की, 'सकाळचा नाश्ता हा एखाद्या राजाप्रमाणे करा, दुपारचं जेवणं एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे आणि रात्रीचं जेवणं गरिबाप्रमाणे करा.' कारण आपण सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दिवसभर शरीराला उर्जा मिळते. पण नाश्ताच केला नाही तर मात्र शरीराला आवश्यक ते घटक मिळत नाहीत. रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही नाश्ता केला नसेल तर शरीर उपाशी असतं. त्यामुळे रात्रीच्या मोठ्या उपासानंतर पौष्टिक आणि चविष्ट नाश्त्याची गरज असते. 

शरीराचं इंधन आहे ब्रेकफास्ट

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळचा नाश्ता आपलं शरीर आणि मेंदूसाठी एखाद्या इंधनाप्रमाणे काम करतं. एक उत्तम आणि पोटभर नाश्ता केल्याने संपूर्ण दिवसभर थकवा जाणवत नाही. तुम्ही फ्रेश राहता. एवढचं नाही तर हे रूटिन फॉलो केलयाने तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. कारण सकाळचा नाश्ता तुमच्या पाचनसंस्थेची योग्य प्रकारे सुरुवात करून देतो आणि इतर कॅलरीयुक्त पदार्थांपासून वाचवतो. 

खरचं ब्रंचमुळे नाश्त्याची भरपाई होते का?

अनेकदा वीकेंडच्या दिवशी लोकं नाश्ता आणि लंचऐवजी ब्रंच करण्याला पसंती देतात. अशातच आपल्यापैकी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, असं करणं खरचं हेल्दी ठरतं का? कारण वीकेंडचा दिवस आरामाचा दिवस असून यादिवशी इतर दिवसांपेक्षा कमी मेहनत करण्यात येते. त्यामुळे तुम्ही या दिवशी ब्रंच करू शकता. पण लक्षात ठेवा त्यामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या जास्तीत जास्त पोषकतत्वांचा समावेश करावा. 

या गोष्टी लक्षात ठेवा :

- जर तुम्ही ब्रंच प्लॅन करत असाल तर लक्षात ठेवा की, झोपेतून उठल्यानंतर दोन तासांच्या आतच तुम्ही ब्रंच करणं फायदेशीर ठरतं. 

- नाश्त्यामध्ये कॅल्शिअम, लोहतत्व, व्हिटॅमिन-बी, प्रोटीन आणि फायबर यांसारखी पोषक तत्वांचा समावेश असावा. त्यामुळे ब्रंचमध्ये अनेक भाज्या, फळं आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करावा. 

- जर तुम्ही प्रत्येक दिवशी पाच कप फळं आणि भाज्या खात असाल तर ब्रंच करताना कमीत कमी एक कप फळं आणि भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. 

- जर तुम्ही वीकेंडच्या आळसामध्ये विचार करत असाल की, नाश्ताही न करता ब्रंच बाहेरून ऑर्डर करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दोन्ही चुकीच्या गोष्टींना एकत्र करत आहात. त्यामुळे प्रयत्न करा की, ब्रंच घरीच तयार करा. ज्यामध्ये सर्व पोषक तत्वांचा समावेश करा. 

- उत्तम आहार मेंदूला योग्य वेळी ग्लूकोजचा पुरवठा करतो. त्यामुळे नियमितपणे नाश्ता केल्याने स्मृति आणि एकाग्रता उत्तम राहते. 

Web Title: Can breakfast can replaced by brunch what is called diet expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.