सर्दी-खोकल्यासोबतच अनेक आजारांवर फायदेशीर ठरते वेलची!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 03:47 PM2018-11-01T15:47:09+5:302018-11-01T15:53:03+5:30
हिवाळ्यामध्ये सर्दी-खोकला, ताप किंवा घशामध्ये खवखव होणं यांसारख्या समस्या सर्वांनाच उद्भवतात. या समस्या अत्यंत साधारण असतात परंतु यांमुळे एखादं काम करणंही अवघड होऊन जातं. मग यांपासून सुटका करून घेण्यासाठी औषधांचा वापर करण्यात येतो.
हिवाळ्यामध्ये सर्दी-खोकला, ताप किंवा घशामध्ये खवखव होणं यांसारख्या समस्या सर्वांनाच उद्भवतात. या समस्या अत्यंत साधारण असतात परंतु यांमुळे एखादं काम करणंही अवघड होऊन जातं. मग यांपासून सुटका करून घेण्यासाठी औषधांचा वापर करण्यात येतो. पंरतु घरात उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून अगदी सहज या समस्यांपासून सुटका मिळवता येऊ शकते. सध्या भारतातील अनेक शहरांना स्मॉगचा त्रास सहन करावा लागत आहे. स्मॉगमुळे या शहरांमधील हवा फार प्रदूषित झाली आहे. प्रदूषित हवेमुळे खोकला, श्वसनाचे विकार, ब्रॉन्कायटिस, नाक, कान, घशाचे विकार, फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन आणि दमा यासारख्या आजारांचा धोका संभवतो. या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी वेलचीचा वापर करणं फायदेशीर ठरतं.
या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी काही घरगुती उपाय करणंही फायदेशीर ठरतं. जाणून घेऊयात एका अशा घरगुती उपायाबाबत...
हिरव्या वेलचीचा फार पूर्वीपासूनच भारतीय मसाल्यांच्या पदार्थांमध्ये समावेश होतो. पदार्थांमध्ये चवीसोबतच सुगंध आणण्यासाठी वेलचीचा वापर करण्यात येतो. वेलची आरोग्यासाठी वरदान ठरते. वेलचीमध्ये अॅन्टीओक्सिडेंट आणि अॅन्टीबॅक्टेरिअल गुणधर्म आढळून येतात. जे हृदयाचे आरोग्य राखण्यासोबतच ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठीही मदत करतात.
घशामध्ये होणारी खवखव आणि सर्दी खोकल्याची समस्या विषारी पदार्थांमुळे होते. जे आतड्यांमध्ये जावून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे आतड्यांचं निरोगी राहणं आवश्यक आहे. वेलची आतड्यांच्या समस्या दूर करून ती निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. वेलच्या झाडामध्ये अनेक अल्कोलोइड असतात ज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सीडेंट आणि आरोग्यासाठी अनेक आवश्यक अशी तत्व असतात. यामधील अॅन्टी इंफ्लेमेटरी गुण वेदना आणि सूज कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. त्याचप्रमाणे वेलचीचे अनेक गुमधर्म आहेत जे आरोग्यासाठी वरदान ठरतात. जाणून घेऊया वेलचीच्या होणाऱ्या फायद्यांबाबत...
1. खोकल्यासाठी वेलचीचा वापर करा
चिमुटभर वेलची पावडर आणि चिमुटभर काळ मीठ, एक चमचा तूप आणि एक चमचा मध एकत्र करून पेस्ट तयार करा. यामुळे खोकला नाहीसा होण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त 2 ग्रॅम वेलचीच्या दाण्यांची पावडर, सुंठ आणि मध एकत्र करून हे मिश्रण खाल्याने खोकल्याची समस्या नाहीशी होण्यास मदत होईल.
2. सर्दी दूर करण्यासाठी वेलचीचा उपयोग
वेलचीचा समावेश फक्त मसाल्याचे पदार्थ म्हणून होत नाही तर हे सर्दी आणि खोकला दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. सर्दी झाली असल्यास वेलचीची पूड एका रूमालावर लावून त्याचा गंध घेतल्याने समस्या दूर होते.
3. सुकलेल्या घशासाठी वेलचीचा वापर
हिरवी वेलची आणि लवंग बारिक करून तयार मिश्रण खाल्याने प्रदूषण आणि धूळीच्या कणांमुळे होणारा त्रास दूर होतो. यामधील अॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म प्रदूषणाच्या विषारी प्रभाव दूर करण्यासाठी मदत करतात.
4. घशातील खवखव दूर करण्यासाठी
घशातील खवखवीपसून सुटका करून घेण्यासाठी वेलचीचे काही दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळ उठल्यावर या पाण्याने गुळण्या करा.
5. खोकला आणि छातीमध्ये होणारी जळजळ दूर करण्यासाठी
वेलची आणि साखर एकत्र करून त्याची पावडर तयार करा. दिवसातून 2 ते 3 वेळा तयार मिश्रण पाण्यामध्ये मिक्स करून घ्या.