Christmas 2018 : कधी तयार केला होता ख्रिसमसचा पहिला केक?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 02:15 PM2018-12-25T14:15:22+5:302018-12-25T14:15:53+5:30
सध्या जगभरात ख्रिसमसचा जल्लोष बघायला मिळत आहे. ख्रिसमस म्हटलं की, गिफ्टसोबतच सर्वात जास्त उत्सुकता असते ती ख्रिसमस केकची.
सध्या जगभरात ख्रिसमसचा जल्लोष बघायला मिळत आहे. ख्रिसमस म्हटलं की, गिफ्टसोबतच सर्वात जास्त उत्सुकता असते ती ख्रिसमस केकची. ख्रिसमसला केकचं एक वेगळंच महत्त्व असतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ख्रिसमसच्या केकचा रोमांचक इतिहासही आहे. चला जाणून घेऊ केकचा इतिहास...
कधी तयार केला होता पहिला केक
ख्रिसमसच्या केकची कॉन्सेप्टी १६ व्या शतकातील आहे. याआधी ख्रिसमसला केक कापण्याची किंवा तयार करण्याची प्रथा सुरु झाली नव्हती. जाणकारांनुसार, फार पूर्वी लोक ब्रेड आणि भाज्यांना एकत्र करुन एक डिश तयार करत होते. या डिशला प्लम पुडीजची प्रथा म्हटलं जात होतं. १६व्या शतकात हे पुडिंग काढून त्याजागी गव्हाच्या पीठाचा वापर होऊ लागला.
त्यानंतर अंडी, लोणी आणि उकळलेल्या फळांचा प्लम मिश्रित केला जाऊ लागला. काही लोकांकडे तेव्हा तंदूर असत. ज्यात ते ही डिश ठेवून शिजवू लागले. नंतर हळूहळू या पक्वानाने केकचं रुप धारण केलं.
एक महिन्याआधी सुरु होते केक करण्याची प्रोसेस
असे सांगितले जाते की, ख्रिसमससाठी केक तयार करण्याची तयारी साधारण एक महिन्याआधी सुरु केली जाते. ख्रिसमसला फ्रूट केकची सर्वात जास्त डिमांड असते. तसेच लोक प्लम केकही खरेदी करतात.
केकमध्ये टाकलं जातं किशमिश
ख्रिसमसच्या केकला फंगसपासून वाचवण्यासाठी त्यात सर्वात जास्त किशमिशचा वापर केला जातो. लोक एक-दोन महिन्यांआधीच किशमिश धुवून आणि सुकवून ठेवतात. कारण किशमिश जराही ओलं असलं तर केस खराब होण्याची शक्यता असते.