New Year साजरा करण्यासाठी खर्च कशाला? केक बनवण्याच्या ट्रीक्स वापरा अन् उत्सव करा साजरा

By manali.bagul | Published: December 23, 2020 04:08 PM2020-12-23T16:08:50+5:302020-12-23T16:14:06+5:30

Christmas cakes Tips in Marathi : तुम्हाला घरच्याघरी केक तयार करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही कमीत कमी खर्चात चविष्ट, स्पॉन्जी केस  तयार करू शकता. 

Christmas cake baking tips that can substitute eggs in making bakery products | New Year साजरा करण्यासाठी खर्च कशाला? केक बनवण्याच्या ट्रीक्स वापरा अन् उत्सव करा साजरा

New Year साजरा करण्यासाठी खर्च कशाला? केक बनवण्याच्या ट्रीक्स वापरा अन् उत्सव करा साजरा

Next

ख्रिसमसला आणि नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नेहमीच तुम्ही न्यू ईअर बाहेर मित्र मैत्रिणींना भेटून किंवा नातेवाईकांना भेटून साजरा करत असाल. पण यंदा मात्र कोरोनाच्या माहामारीमुळे  आधीसारखं घराबाहेर पडता येणार नाही.  त्यामुळेच घरच्याघरी सुट्टीचा आनंद घ्यावा लागेल. आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी केक तयार करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही कमीत कमी खर्चात चविष्ट, स्पॉन्जी केस  तयार करू शकता. 

अनेकजण केक चांगला बनण्यासाठी त्यात अंड्याचा वापर करतात. पण तुम्हाला अंड्याचा वापर केकमध्ये टाळायचा असेल तर काय करता येईल याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केक बनवतांना काही टिप्स लक्षात घेतल्या तर आपला केक हमखास चांगला बनतो. अनेकदा केक फुगत नाही चवीला चांगला होत नाही त्याचा सुगंध बेकरी मधील केक सारखा येत नाही. असं होऊ नये म्हणून या टिप्स नक्की उपयोगी येतील.

अंड्याऐवजी या पदार्थांचा वापर करू शकता

केळी- केक तयार करत असताना तुम्ही अंड्यऐवजी केळ्याचाही वापर करू शकता. ब्रेड, मफिंस तयार करताना त्यात  केळ्याची बारिक पेस्ट करून टाकली तर केक स्पॉजी होतो.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा- व्हिनेगर आणि बेकिंग सोडाचे मिश्रण, केक सॉफ्ट आणि स्पॉजी बनण्यासाठी उत्तम ठरते. 

दही- केक तयार करताना दही हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही अंड्याऐवजी दह्याचा वापर करू शकता. कार्बोनेट वॉटर म्हणजेच इनो किंवा सोड्याच्या पाण्याचा वापर केला तरिही उत्तम केक तयार होऊ शकतो.

केक न फुगण्याची कारणं

केकचे मिश्रण चांगले एकजीव केलं नाही तर किंवा  ओव्हन नीट गरम झाला नसल्यास  तसंच व्होलटेज पुरेसे नसल्यास केक फुगत नाही. साखर जास्त झाल्यास केक फुगत नाही किंवा फुगला तर थंड झाल्यावर परत चपटा होतो.

बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा न वापरल्यास किंवा जुना वापरल्यास  केक चांगला होत नाही. केक तयार करताना तूप, लोणी  वापरण्यापेक्षा बटर वापरावे कारण बटर वापरल्याने केकला तुपकट वास येत नाही. 

केक करताना या गोष्टी लक्षात घ्या

केक बनवताना आपल्याला जे साहीत्य लागते ते प्रमाण बद्ध म्हणजे बरोबर मोजून घ्यावे. आधी ओव्हन नीट चालतो का ते चालू करून बघावे. केक ओव्हनमध्ये ठेवण्या आगोदर ओव्हन गरम करून घ्या मगच भांडे आत ठेवा. केक बनवताना मैदा ताजा आणि चांगला वापरा. केक बनवताना अंडी व लोणी फ्रीजमधून आधी थोडा वेळ बाजूला काढून ठेवा. अंडी वापरताना चांगली फेटून घ्या. केकचे मिश्रण बनवण्या अगोदर भांड्याला बटर लावून ठेवा.

१)

2) 

३) 
 

Web Title: Christmas cake baking tips that can substitute eggs in making bakery products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.