Uric Acid ची समस्या दूर करणारी टेस्टी चटणी, शरीरही आतून होईल साफ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 10:50 AM2024-10-02T10:50:03+5:302024-10-02T10:53:33+5:30
Best Chutney For Uric Acid: आज आम्ही शरीरातील यूरिक अॅसिड कमी करणाऱ्या खास चटणीबाबत सांगणार आहोत. या चटणीचे फायदे आणि ती कशी तयार करावी हे जाणून घेऊया.
Best Chutney For Uric Acid: शरीरात यूरिक अॅसिड वाढल्यावर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. याने शरीरात संधिवात, जॉईंट्समध्ये वेदना आणि सूज या मुख्य समस्या होतात. अशात यूरिक अॅसिड शरीरातून बाहेर काढण्यासाठी आहारात आणि लाइफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतात. यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. मात्र, आज आम्ही शरीरातील यूरिक अॅसिड कमी करणाऱ्या खास चटणीबाबत सांगणार आहोत. या चटणीचे फायदे आणि ती कशी तयार करावी हे जाणून घेऊया.
यूरिक अॅसिड कमी करणारी चटणी
कोथिंबीर - कोथिंबिरीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स गुण असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. याने यूरिक अॅसिड कमी करण्यासही मदत मिळते.
पदीना : पदन्याचं सेवन लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. पदीन्याने शरीराला थंडावा मिळतो. यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे जॉईंट्सची सूज आणि वेदना कमी करू शकतात.
आलं - आलं एक नॅचरल अॅंटी-इन्फ्लेमेटरी एजंट आहे. ज्याच्या मदतीने यूरिक अॅसिडसंबंधी संधिवात आणि सूज कमी करण्यास मदत मिळते. तसेच याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो आणि यूरिक अॅसिड कंट्रोल राहतं.
लिंबाचा रस - लिंबाच्या रसाचे शरीराला अनेक फायदे मिळतात. याने यूरिक अॅंसिडची लेव्हल संतुलित ठेवण्यासही मदत मिळते. यात व्हिटॅमिन सी मुळे शरीर डिटॉक्स होतं आणि यूरिक अॅंसिडचं अवशोषण कमी होतं.
हींग - हींगामुळे पचनक्रिया चांगली होते आणि सूज कमी करण्यासही मदत मिळते. यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे यूरिक अॅंसिडमुळे होणारी वेदना आणि सूज कमी करतात.
चटणीसाठी साहित्य
१ कप कोथिंबीर
अर्धा कप पदीन्याची पाने
१ इंच आल्याचा तुकडा
१ छोटा चमचा लिंबाचा रस
थोडा हींग
१ ते २ हिरव्या मिरच्या
बनवण्याची पद्धत
कोथिंबीर आणि पदीन्याची पाने चांगली धुवून घ्या. आलं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि पदीन्याची पाने मिक्सर ग्राइंडरमध्ये टाका. यात लिंबाचा रस, हींग आणि थोडं पाणी टाका. या सगळ्या गोष्टी चांगल्याप्रकारे बारीक करून घ्या. नंतर यात टेस्टनुसार मीठ टाका आणि पुन्हा एकदा बारीक करा.
या चटणीचं तुम्ही रोज जेवणासोबत सेवन करू शकता. ही चटणी डाळ, चपाती, सलाद किंवा भातासोबत खाणं फायदेशीर ठरेल. या चटणीचं रोज सेवन कराल तर यूरिक अॅसिडची लेव्हल कमी होईल. सोबतच वेदना आणि सूजही कमी होईल.