दालचिनीचे हे आरोग्यदायी फायदे कदाचित तुम्हाला माहिती नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 11:44 AM2018-12-19T11:44:45+5:302018-12-19T11:46:03+5:30

भारत जगात दुसरं सर्वात मोठं डायबिटीज कॅपिटल होताना दिसत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपलं धावपळीचं आणि तणावपूर्ण जीवन, खबार लाइफस्टाइल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी.

Cinnamon reduces blood sugar level include in daily diet | दालचिनीचे हे आरोग्यदायी फायदे कदाचित तुम्हाला माहिती नसतील!

दालचिनीचे हे आरोग्यदायी फायदे कदाचित तुम्हाला माहिती नसतील!

googlenewsNext

भारत जगात दुसरं सर्वात मोठं डायबिटीज कॅपिटल होताना दिसत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपलं धावपळीचं आणि तणावपूर्ण जीवन, खराब लाइफस्टाइल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी. डायबिटीजमुळे आणखीही दुसऱ्या गंभीर आजारांचा धोका अधिक वाढतो. त्यात हृदयरोग, ऑर्गन फेलिअर आणि नर्वस सिस्टीम यांचा समावेश होतो. पण आम्ही डायबिटीजचा धोका कमी करणाऱ्या एका चमत्कारी मसाल्याबाबत तुम्हाला सांगत आहोत, ज्याने शरीरातील शुगरचा प्रभाव कमी करतो आणि तो मसाला म्हणजे दालचिनी.

ब्लड शुगर कमी ठेवण्यास मदत

अनेकप्रकारच्या भाज्या, करी, बेक्ड स्वीट्स, केक आणि कुकीज यांच्यातील सर्वात कॉमन घटक म्हणजे दालचीनी. या मसाल्याचा सुगंध फार चांगला असतो. तसेच याने शरीरात शुगरचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्यासोबतच दालचिनी त्या लोकांसाठी बेस्ट मानली जाते ज्यांना जाडपणा आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्या असतात. 

भरपूर अँटी-ऑक्सिडेंट असणारी दालचीनी

डायबिटीजच्या उपचारासाठी दालचिनीला बेस्ट मानलं जातं, कारण यात अँटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. याने शरीरातील ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी केलं जातं. तसेच पोटावर जमा झालेली चरबीही कमी करण्यास मदतही मिळते.

वजन कमी करण्यास मदत

नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, दालचिनीमुळे केवळ ब्लड शुगर स्तरच कमी केला जात नाही तर कोलेस्ट्रॉल स्तरही कमी करण्यास दालचिनीने मदत मिळते. जर दररोज जेवण केल्यावर गरम पाण्यासोबत दालचिनीचं सेवन केलं तर याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. मात्र दररोज ३ ते ४ ग्रॅमपेक्षा जास्त दालचीनीचं सेवन करु नये. याने तुम्हाला पचनक्रियेत समस्या होऊ शकते. 

दररोजच्या आहारात समावेश करा

तुमच्या दैनंदिन आहारात दालचिनीचा समावेश करण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे दालचिनीची स्टिक किंवा पावडर भाजीमध्ये, सूपमध्ये, कुकीज आणि इतरही मिठाईंमध्ये टाका. याने केवळ तुमचं आरोग्यच चांगलं राहत नाही तर पदार्थांची चवही अधिक वाढते. 

दालचिनीचं पाणी फायदेशीर

एक ग्लास पाण्यात दालचीनी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गरम करा. जेव्हा पाणी कोमट तेव्हा सकाळी हे पाणी सेवन करा. या पाण्याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. सोबतच तुमची पचनक्रियांशी संबंधिक समस्यांपासूनची सुटका मिळण्यास मदत मिळते.  

दालचिनी आणि मध

एका पॅनमध्ये २०० मिलीलीटर पाणी घ्या आणि त्यात एक चमचा दालचीनी पावडर टाका. हे चांगल्याप्रकारे मिश्रित करा आणि हे मिश्रण उकळू द्या. पाणी जेव्हा कोमट होईल तेव्हा त्यात एक चमचा मध टाका आणि हे दिवसातून दोनदा सेवन करा. असे केल्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.

Web Title: Cinnamon reduces blood sugar level include in daily diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.