खमंग, चटपटीत खोबऱ्याची चटणी; चवीला मस्त, झटपट होईल फस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:51 PM2019-07-16T13:51:10+5:302019-07-16T13:53:53+5:30
खोबऱ्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत आपण नेहमीच ऐकतो. अनेकदा डॉक्टर्स किंवा आहारतज्ज्ञही खोबऱ्याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देत असतात.
(Image Credit : The Indian Claypot)
खोबऱ्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत आपण नेहमीच ऐकतो. अनेकदा डॉक्टर्स किंवा आहारतज्ज्ञही खोबऱ्याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देत असतात. खोबऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आमि मिनरल्स असतात. त्यामुळे आरोग्यासाठी हे वेगवेगळ्या रूपामध्ये फायदेशीर ठरतं. अशातच ओल्या खोबऱ्यापासून तयार करण्यात आलेली खोबऱ्याची चटणी (Coconut chutney) खाण्यासाठी अत्यंत चवीष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. जाणून घेऊया टेस्टी आणि हेल्दी खोबऱ्याची चटणी तयार करण्याची कृती आणि त्यामुळे शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत...
अशी तयार करा ओल्या खोबऱ्याची चटणी
साहित्य :
- एक नारळ
- हिरवी मिरची
- लिंबू
- मीठ
- एक चमचा तेल
- राई
- कढिपत्ता
- लाल मिरची पावडर
- कोथिंबीर
कृती :
- सर्वात आधी नारळ फोडून त्यातील खोबरं काढून घ्या.
- त्यानंतर खोबरं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या.
- मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, हिरवी कोथिंबीर, हिरव मिरची, लिंबाचा रस, मीठ आणि थोडसं पाणी एकत्र करून बारिक करून घ्या.
- तयार चटणी एखाद्या बाउलमध्ये काढून चवीनुसार त्यामध्ये पाणी एकत्र करा.
- एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये राई एकत्र करून थोडं परतून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये कढिपत्ता, लाल मिरची पावडर एकत्र करून गॅस बंद करा.
- आता तयार फोडणी चटणीमध्ये एकत्र करा.
- तुमची हेल्दी आणि टेस्टी खोबऱ्याची चटणी तयार आहे.
तयार चटणी तुम्ही जेवणासोबत वाढू शकता. तसेच डोसा, इडली यांसारख्या पदार्थांसोबतही सर्व्ह करू शकता. खोबऱ्याची चटणी खाल्लाने हृदयाचे आरोग्य उत्तम राहतं आणि कोलेस्ट्रॉलही सामान्य राहतं. यासोबतच शरीरातील ब्ल़ प्लेटलेट्सचीही संख्या वाढते. जाणून घेऊया खोबऱ्याच्या चटणीचे इतर आरोग्यदायी फायदे...
खोबऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिज तत्व, साखरेतील घटक, कार्बोहायड्रेट्स असतात. हे शरीरातील फॅट्स कमी करतात. खोबऱ्यामध्ये अनेक औषधी तत्व असतात. अनेकदा लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. अशावेळी मुलांच्या आहारामध्ये खोबऱ्याच्या चटणीचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. यामध्ये 5.1 मायक्रोग्रॅम सेलेनियम असतं.
महिलांसाठी फायदेशीर
खोबऱ्याची चटणी वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. वाढत्या वयानुसार महिलांना अनेक शरीराच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे आयर्नदेखील कमी होतं. ज्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. खोबऱ्याची चटणी खाल्याने शरीरामध्ये रक्त आणि आयर्नची कमतरता दूर होते. त्यामुळे अनीमियासारख्या आजारावर खोबऱ्याची चटणी अत्यंत फायदेशीर ठरते.
पुरूषांसाठी फायदेशीर
पुरूषांमध्ये जर लैंगिक समस्या असतील तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी खोबऱ्याची चटणी अत्यंत फायदेशीर ठरते. तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता. सुक्या खोबऱ्यामध्ये सेलेनियम असतं. जे पुरूषांच्या लैंगिक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.