coronavirus : आवळा आणि पुदीन्याचा खास ज्यूस, इम्यूनिटी वाढवण्यासाठी बेस्ट उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 04:27 PM2020-03-21T16:27:00+5:302020-03-21T16:37:14+5:30

आम्ही तुम्हाला इम्यूनिटी वाढवण्याचा एक खास उपाय सांगत आहोत. ज्याद्वारे तुम्हाला जास्तीत जास्त व्हिटॅमिन सी सोबतच इतरही अनेक पोषक तत्व मिळतील.

coronavirus : Amla and mint juice increase body immunity help fighting cold api | coronavirus : आवळा आणि पुदीन्याचा खास ज्यूस, इम्यूनिटी वाढवण्यासाठी बेस्ट उपाय!

coronavirus : आवळा आणि पुदीन्याचा खास ज्यूस, इम्यूनिटी वाढवण्यासाठी बेस्ट उपाय!

Next

आता वातावरण तापू लागलं आहे. दिवसा उकडतंय आणि रात्री थंड वाटतं. लोकांनी आता हलके कपडे घालायला सुरूवात केली आहे. वातावरण बदलामुळे फ्लू, कोल्ड, खोकला, सर्दी या समस्या होणं सामान्य बाब आहे. म्हणजे इम्यूनिटी कमजोर झाल्यावर या समस्या होतात. अशात कोरोना व्हायरस इम्यूनिटी कमजोर असलेल्यांची शिकार करतो. म्हणून इम्यूनिटी कमजोर होऊ न देण्यासाठी वेगवेगळी काळजी घेणं गरजेचं आहे.

आम्ही तुम्हाला इम्यूनिटी वाढवण्याचा एक खास उपाय सांगत आहोत. ज्याद्वारे तुम्हाला जास्तीत जास्त व्हिटॅमिन सी सोबतच इतरही अनेक पोषक तत्व मिळतील. सोबतच तुमची इम्यूनिटीही वाढेल.

एक खासप्रकारचा ज्यूस आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याने तुमची इम्यूनिटी वाढेल. जर तुम्हाला सर्दी, खोकल्या समस्या असेल तर तुम्हाला हा ज्यूस फायदेशीर ठरतो. यासाठी ज्यूस तयार करण्यासाठी आवळा, आलं आणि पुदीन्याची पाने तसेच धण्याची पाने लागतील.

व्हिटॅमिन सी भरपूर मिळणार

धण्याच्या आणि पुदीन्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं. पुदीन्यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इफ्लेमेटरी गुण असतात. जे सर्दी, खोकला झाल्यावर होणारी जळजळ दूर करण्यास मदत करतात. तेच धण्यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आढळतात. याच्या पानांमध्ये डिटॉक्सिफाइंग, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि इम्यूनिटी वाढवणारे गुण असतात.

आवळा आणि आलं

नियमितपणे आवळ्याचं सेवन केलं तर शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढते. ज्याने शरीराला संक्रमण आणि आजारांशी लढण्यासाठी मदत मिळते. आवळ्यात आयर्न, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात. तेच आल्यात जिंजरोल आढळतं. जिंजरोलमध्ये एनाल्जेसिक, सेडविक, अ‍ॅंन्टीपायरेटिक आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्याने शरीराची इम्यूनिटी वाढते. आल्याचं सेवन सर्दी, खोकल्यासोबतच ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठीही बेस्ट मानलं जातं.


Web Title: coronavirus : Amla and mint juice increase body immunity help fighting cold api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.