जगभरातील 'ही' आगळी-वेगळी चॉकलेट्स एकदा तरी चाखून पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 10:45 AM2018-08-21T10:45:27+5:302018-08-21T10:52:36+5:30

चॉकलेटचं नाव ऐकलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कुछ मीठा हो जाये... असं म्हणत घरात बनणाऱ्या गोडधोड पदार्थांची जागाही अगदी सहज चॉकलेटने घेतली.

craziest and weird chocolate flavors information | जगभरातील 'ही' आगळी-वेगळी चॉकलेट्स एकदा तरी चाखून पाहा!

जगभरातील 'ही' आगळी-वेगळी चॉकलेट्स एकदा तरी चाखून पाहा!

googlenewsNext

चॉकलेटचं नाव ऐकलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कुछ मीठा हो जाये... असं म्हणत घरात बनणाऱ्या गोडधोड पदार्थांची जागाही अगदी सहज चॉकलेटने घेतली. कोणाचा वाढदिवस असो किंवा मग एखादा खास दिवस. त्यानिमित्ताने भेट देण्यासाठी अगदी सहज चॉकलेटचा वापर करण्यात येतो. पण आज अशा काही चॉकलेट्सबाबत जाणून घेऊयात जे आपल्या आगळ्या वेगळ्या फ्लेवर्ससाठी प्रसिद्ध आहेत. 

1. स्वीट पोटॅटो किट-कॅट

स्वीट पोटॅटो संपूर्ण जगभरात खाण्यात येतात. पण जपानमध्ये स्वीट पोटॅटोच्या फ्लेवरचे चॉकलेट्स तयार केले आहेत. किट कॅटने हे चॉकलेट तयार केलं असून त्याला स्वीट पोटॅटोचं नावही दिलं आहे. 

2. बेकन चॉकलेट

ज्या लोकांना बेकन खायला आवडतं, त्यांना हे बेकन चॉकलेट नक्की आवडेल. पण शाकाहारी लोकांनी हे चॉकलेट खाणं टाळावं.

3. फ्रेंच टोस्ट चॉकलेट

सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेकदा फ्रेंच टोस्टचा समावेश करण्यात आलेला असतो. आता या फ्लेवरचं चॉकलेटही बाजारामध्ये आलं आहे. 

4. इंडियन करी चॉकलेट

भारतीय पदार्थ आणि भारतीय मसाल्यांचा स्वाद चाखता यावा यासाठी इंडियन करी चॉकलेट तयार करण्यात आलं आहे. भारत सोडून अन्य देशांमध्ये हे चॉकलेट आपल्याला सहज मिळते.

5. दालचीनी आणि मिरचीचं चॉकलेट

जर तुम्हाला मसाले आणि मसाल्याच्या पदार्थांच्या चवी आवडतं असतील तर तुम्ही दालचीनी आणि मिरचीपासून तयार करण्यात आलेलं हे चॉकलेट नक्की खाऊ शकता. मेक्सिकन लोकांनी दालचीनी, मिरची आणि डार्क चॉकलेट एकत्र करून तयार केलं आहे.

6. ग्रीन टी फ्लेवर्ड चॉकलेट

जपानचे लोकं आपलं आरोग्य आणि फिगरच्याबाबतीत फार जागरूक असतात. त्यासाठी त्यांनी ग्रीन टी असलेलं चॉकलेट तयार केलं आहे. तुम्हीही हेल्दी पदार्थ खाणं पसंत करत असाल तर हे चॉकलेट नक्की खाल्लं पाहिजे.

7. कॅमल मिल्क चॉकलेट

उंटाच्या दूधापासून तयार करण्यात आलेलं हे चॉकलेट दुबईमध्ये तयार करण्यात येतं. दुबईमधूनचं हे चॉकलेट जगभरात पोहोचवलं जातं. 

Web Title: craziest and weird chocolate flavors information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.