पोषक तत्वांचा खजिना आहे सीताफळ; डोळे, हृदय यांचं आरोग्य राखण्यास करतं मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:36 AM2019-10-17T11:36:57+5:302019-10-17T11:45:53+5:30
सिताफळ पोषक तत्वांचा खजिना आहे, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. खासकरून जर हे फळं गरोदरपणात आई आणि बाळासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
सिताफळ पोषक तत्वांचा खजिना आहे, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. खासकरून जर हे फळं गरोदरपणात आई आणि बाळासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दरम्यान सिताफळ अनेक गंभीर आजारांमध्येही फायदेशीर ठरतं. हाय आणि लो ब्लड प्रेशर, डायबिटीस, हृदयरोग यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी सिताफळ मदत करतं. त्याचबरोबर सिताफळ रोगप्रतिकार शक्ती मजबुत करण्यासाठीही मदत करतं.
व्हिटॅमिन सी आणि अॅन्टीऑक्सिडंट मुबलक असल्यामुळे अॅलर्जी आणि कॅन्सरसारख्या आजारांपासूनही बचाव करण्याचं काम करतो. तसेच हे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्याचंही काम करतं. यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असतं. सिताफळमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतं. जे डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. एवढचं नाहीतर अपचन गॅस यांसारख्या समस्यांमध्ये सिताफळ गुणकारी ठरतं. सिताफळ तुम्ही कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता. तुम्ही शक्य असल्यास सिताफळ स्मूदी किंवा सिताफळ शेक पिऊ शकता.
सिताफळाच्या इतर आरोग्यादायी फायद्यांबाबत जाणून घेऊया...
गरोदरपणात फायदेशीर...
गरोदरपणात सिताफळ खाणं आईसाठी आणि बाळासाठी फायदेशीर मानलं जातं. सिताफळाच्या सेवनाने पोटात वाढणाऱ्या अर्भकाचा विकास होतो. तसेच गर्भपाताचा धोकाही कमी होतो. तसेच नॉर्मल डिलिवरीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात.
हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर...
सितापळामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचं प्रमाण मुबलक प्रमाणात असतं आणि हे हार्ट अचॅकचा धोका रोखण्यासाठी मदत करतात. दररोज याचं सेवन केल्याने मांसपेशी मजबुत होतात. तसेच शरीरात होणाऱ्या वेदनांपासून सुटका होते. व्हिटॅमिन बी6 होमोसिस्टीन रोखतं त्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.
रोगप्रतिकार शक्ती होते मजबुत..
दररोज तीन सिताफळ खाल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबुत होते. तसेच आजारातू झटपट बरं होण्यासाठीही सिताफळ मदत करतं. शरीराला रोगोपासून लढण्यासाठी शक्ती देण्याचं काम सिताफळ करतं.
सुस्ती आणि थकवा दूर करतं
सिताफळ खाल्याने अस्वस्थता, थकवा दूर होतो. तसेच स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदनाही दूर होऊन आराम मिळतो.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)