तुम्हाला टाईप 2 मधुमेह आहे का? उपाशी राहू नका, असं करा जेवणाचं नियोजन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 06:31 PM2019-04-24T18:31:12+5:302019-04-24T18:32:05+5:30

जर तुम्हाला टाइप 2 डायबिटीज असेल तर स्वतःसाठी एक खास डाएट प्लॅन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे ठरवलं की, दिवसभरामध्ये तुम्हाला कोणत्या पदार्थांचे सेवन किती प्रमाणात करायचे आहे तर ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Daily meal plan for type 2 diabetes patients | तुम्हाला टाईप 2 मधुमेह आहे का? उपाशी राहू नका, असं करा जेवणाचं नियोजन!

तुम्हाला टाईप 2 मधुमेह आहे का? उपाशी राहू नका, असं करा जेवणाचं नियोजन!

Next

जर तुम्हाला टाइप 2 डायबिटीज असेल तर स्वतःसाठी एक खास डाएट प्लॅन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे ठरवलं की, दिवसभरामध्ये तुम्हाला कोणत्या पदार्थांचे सेवन किती प्रमाणात करायचे आहे तर ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. अनेकजण डायबिटीज झाल्यानंतर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींन आळा घालतात. यामुळे शरीरामध्ये पोषणाची कमतरता होऊ शकते. लक्षात ठेवा की, शुगर कंट्रोल करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नसते. जाणून घेऊया टाइप 2 डायबिटीज असेल तर तुम्ही कसं डाएट प्लॅन करणं गरजेचं आहे त्याबाबत... 

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डायबिज नियंत्रणात ठेवताना औषधांसोबतच एक्सरसाइज आणि उत्तम डाएटची गरज असते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याच गोष्टींचा समावेश करून अनेक लोक आपलं डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवतात. खरं तर तुम्हाला असा डाएट प्लॅन करणं गरजेचं आहे की, ज्यामुळे तुम्ही उपाशीही राहणार नाही आणि तुमची शुगरही नियंत्रणात राहण्यास मदत होईल. पण त्या पदार्थांमध्ये जास्तीत जास्त पोषक पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. कार्बेहायड्रेट, प्रोटीन, विटमिन, मिनरल्स इत्यादी. या सर्व पदार्थांचे प्रमाण निश्चित करणं आवश्यक असतं. 

कार्बोहायड्रेट 

कार्बोहायड्रेट आणि स्टार्चयुक्त पदार्थांमुळे ब्लड शुगर अधिक वेगाने वाढते. त्यामुळे जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण फार कमी असणं गरजेचं आहे. जेवणामध्ये फक्त दोनच चपात्यांचा समावेश करा. कधीकधी थोडासा भात खाणंही फायदेशीर ठरतं. त्यामुळे प्रयत्न करा की, आहारामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण शक्यतो कमीच असावं. त्यासाठी तुम्ही एखाद्या डाएटिशनकडूनही सल्ला घेऊ शकता. 

प्रोटीन 

तुमच्या जेवणामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असावं. डाळ, स्प्राउट्स यांसारख्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करणं फायदेशीर ठरतं. चपाती आणि तांदूळ कमी खाल्याने पोट भरल्याप्रमाणे वाटतं. त्याऐवजी भरपूर डाळ खा. त्यामुळे आपलं पोट बराच वेळ भरल्याप्रमाणे वाटते.

फळं आणि भाज्या

प्रत्येकवेळी खाण्यामध्ये एखादं तरी फळं अवश्य समाविष्ट करा. जेवणामध्ये भाज्यांचाही मुबलक प्रमाणात समावेश करा. तसचे सलाडचाही समावेश करा. यामुळे फायबर मोठ्या प्रमाणत मिळतं आणि त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. 

आपला खुराक जास्त असेल आणि कार्ब्स कमी खाण्याच्या विचारात तुमची भूक भागत नसेल तर जेवणामध्ये दूध-दही यांचा समावेश करा. साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी एकचं गुरूमंत्र आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तो म्हणजे, 'कमी खा आणि सारखं-सारखं खा'. म्हणजेच एकाचवेळी जास्त खाण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खाणं गरजेचं असतं. त्यामुळे तुमची ब्लड शुगर जास्त वाढणार नाही. 

नाश्त्यामध्ये डाळ, दूध, स्प्राउट्स, सलाड, अंडी यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. सफरचंद, पपई, जांभूळ, संत्री यांसारख्या फळांचा आहारात समावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. नाश्त्याआधी काही ड्रायफ्रुट्सचाही आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

'या' पदार्थांचे सेवन करणं शक्यतो टाळाच...

- फुल क्रीम दूधाचं सेवन करणं टाळा. 

- मिठाई किंवा इतर कोणतेही पदार्थ ज्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. असे पदार्थ खाणं टाळा. 

- बटाटा किंवा रताळी खाऊ नका. 

- जंक फूडपासून दूर रहा. 

- तळलेल्या पदार्थांपासून दूर रहा. 

- तूप, बटर आणि चिकट पदार्थ खाण्यापासून टाळा. 

- मैद्याऐवजी पिठाचाच वापर करा. बेक्ड बिस्किट खाण्यापासून दूर रहा. ब्रेड खाण्याची गरज असेल तर शक्यतो ब्राउन ब्रेडच खा. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. 

Web Title: Daily meal plan for type 2 diabetes patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.