हिवाळ्यात शरीर आतून गरम ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचं करा सेवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 11:03 AM2019-11-06T11:03:30+5:302019-11-06T11:03:55+5:30
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण वुलनचे कपडे वापरतात. याने शरीर गरम राहतं.
(Image Credit : elmundo.es)
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण वुलनचे कपडे वापरतात. याने शरीर गरम राहतं. त्यासोबतच असेही काही पदार्थ आहेत ज्यांचं सेवन करून तुमचं शरीर थंडीच्या दिवसात आतून गरम ठेवतात. हे पदार्थ खाऊन तुम्हाला थंडी वाजणार नाही. याचा फायदा असा होईल की, थंडीच्या दिवसातील थंड हवेमुळे तुम्ही आजारी पडणार नाही. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे पदार्थ.....
हिरवी मिर्ची - तिखट हिरव्या मिर्ची खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. मिर्चीचा तिखटपणा शरीराचं तापमान वाढवतो. ज्याने आतून गरम वाटतं. त्यामुळे थंडी दूर करण्यासाठी तुम्ही हिवाळ्यात हिरव्या तिखट मिर्च खाऊ शकता.
ड्राय फ्रूट्स - ड्राय फ्रूट्स जसे की, बदाम, खजूर, मनुके इत्याही खाऊन तुम्ही शरीर आतून गरम ठेवू शकता. यातील पोषक तत्व जसे की, व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशिअम, कॉपर, झिंक, कॅल्शिअम आणि इतरही हेल्दी प्रोटीन असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
आले - आल्याचा गुणधर्म हा उष्ण असतो. हिवाळ्यात छोट्या छोट्या समस्या जसे की, खोकला, सर्दी-पळसा, घशात खवखव, इन्फेक्शन, ताप इत्यादी दूर करण्यासाठी तुम्ही आल्याचे सेवन करू शकता. अनेकजण या दिवसात आल्याचा चहाही सेवन करतात.
कांदा - या दिवसात कांदाही शरीराचं तापमान वाढवतो. कांदा तुम्ही अधिक खात असा तर शरीरातून घाम घेऊ लागतो. तसेच कांद्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. त्यामुळे या दिवसात भरपूर कांदा खावा.
हळद - हळदीचं सेवन केल्याने तुम्ही अनेक रोगांपासून आणि इन्फेक्शनपासून बचाव करू शकता. आयुर्वेदातही हळदीला फार महत्त्व देण्यात आलं आहे. गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्याने तुम्हाला गरम वाटेल आणि इन्फेक्शनपासूनही तुमचा बचाव होईल.