उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन टाळण्यासाठी; थंडा थंडा कूल कूल वॉटरमेलन शेक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 12:29 PM2019-04-25T12:29:40+5:302019-04-25T12:37:27+5:30

आपण सर्वच उन्हाळ्यामध्ये खाण्याच्या पदार्थांवर कमी आणि पेय पदार्थांवर जास्त भर देण्यात येतो. परंतु काही लोकांना एकाच प्रकारच्या डाएटमुळे त्रास होतो किंवा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो.

Diet watermelon recipes keep young in summer or summer special watermelon drink | उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन टाळण्यासाठी; थंडा थंडा कूल कूल वॉटरमेलन शेक 

उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन टाळण्यासाठी; थंडा थंडा कूल कूल वॉटरमेलन शेक 

Next

आपण सर्वच उन्हाळ्यामध्ये खाण्याच्या पदार्थांवर कमी आणि पेय पदार्थांवर जास्त भर देण्यात येतो. परंतु काही लोकांना एकाच प्रकारच्या डाएटमुळे त्रास होतो किंवा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. डाएट एक्सपर्ट्सच्या मते, सतत एकच डाएट फॉलो करण्यापेक्षा डाएटमध्ये बदल करणं गरजेचं असतं. उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनेक लोक कलिंगड खाण्याचा सल्ला देतात. एक ते दोन दिवस कलिंगड खाल्यानंतर कलिंगड खाण्याची इच्छा होत नाही. परंतु उन्हाळ्यामध्ये आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि डिहायड्रेशनपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी कलिंगड खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. जर तुम्हालाही कलिंगडाचा दररोज डाएटमध्ये समावेश करण्याची इच्छा असेल तर वॉटरमेलन शेक ट्राय करू शकता. शरीराला थंडावा देण्यासोबतच आरोग्यसाठीही फायदेशीर ठरतं कलिंगड...

वॉटरमेलन शेक :

कोणताही शेक तयार करण्यासाठी काही आवश्यक साहित्य तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला कलिंगड, दूध आणि आइस्क्रीमची गरज असते. तुम्ही या शेकमध्ये काही ड्रायफ्रुट्सही एकत्र करू शकता. तुम्हाला जर गोड शेक आवडत असेल तर साखरेऐवजी मधाचा वापर करू शकता. जाणून घेऊया वॉटरमेलन शेक तयार करण्याची पद्धत...

वॉटरमेलन शेक तयार करण्याती पद्धत :

कलिंगड कापून त्याचे लहान तुकडे करून घ्यावे. मिक्सरमध्ये एकत्र करून त्याची प्युरी तयार करावी. कलिंगडाची प्युरी तयार केल्यानंतर दूध आणि मध एकत्र करून व्यवस्थित एकत्र करा. 

कलिंगडाचा शेक पिण्यासाठी तयार आहे. आता तुम्ही बारिक केलेले कलिंगडाचे तुकडे त्यामध्ये एकत्र करू शकता. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आइस्क्रिमही एकत्र करू शकता. जर तुम्हाला थंड शेक आवडत असेल तर काही बर्फाचे तुकडेही एकत्र करू शकता. 

कलिंगडाचे काही आरोग्यदायी फायदे :

- कलिंगडामध्ये लायकोपिन असतं, याने त्वचेची चमक कायम राहते.

- हृदयासंबंधी समस्या रोखण्यासाठी कलिंगड हे रामबाण उपाय आहे. कलिंगड कोलेस्टॉल लेव्हल कमी करतं. ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांपासून सुटका होऊ शकते.   

- कलिंगडात व्हिटामिन ए असतं आणि  व्हिटामिन ए डोळ्यांसाठी चांगलं असतं. 

- कलिंगड खाल्ल्याने डोकं शांत राहतं आणि चिडचिड कमी होते. 

- कलिंगडाच्या बीयाही उपयोगी असतात. या बीयाचं पावडर करुन ते चेह-यावर लावल्यास त्वचा चमकदार होते. तसेच याचा लेप डोके दु:खीवर चांगला उपाय आहे. 

- कलिंगडाचे नियमीत सेवन केल्यास पोटाचा त्रास कमी होतो. तसेच रक्ताची कमतरता असेल तर कलिंगडाचा रस फायदेशीर ठरतो.

- कलिंगड चेह-यावर तावल्यास चेहरा ताजातवाणा होते आणि ब्लॅकहेड्सही दूर होतात.

Web Title: Diet watermelon recipes keep young in summer or summer special watermelon drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.