कसे ओळखाल लसूण चायनीज आहे? वाचा गावरान आणि चायनीज लसणातील फरक....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 12:55 PM2024-10-05T12:55:29+5:302024-10-05T12:57:03+5:30
Chinese and Desi Garlic: लोकांना गावरान लसूण आणि चायनीज लसूण यात फरक कसा करावा हे कळत नाहीये. अशात यात काय फरक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Chinese and Desi Garlic: सध्या बाजारात चायनीज लसूण मिळत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. अशात लोकांना गावरान लसूण आणि चायनीज लसूण यात फरक कसा करावा हे कळत नाहीये. अशात यात काय फरक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मोठा गाठा, स्वच्छ आणि शुभ्र दिसणारा व सोबत स्वस्तात मिळणारा लसूण तुम्ही घरी आणून वापराल तर तुमच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. कारण हा लसूण चायनीज आहे. जो देशातील लखनौसहीत अनेक शहरांमध्ये विकला जात आहे. हा लसूण २०१४ पासून बॅन आहे.
एक महत्वाचा मुद्दा असाही आहे की, जास्तीत जास्त भाजी विक्रेत्यांना चायनीज लसणाची माहिती नाही. ते केवळ स्वस्त मिळतो म्हणून तो खरेदी करतात आणि विकतात.
चायनीज लसणाची ओळख
चायनीज लसूण दिसायला टवटवीत दिसतो. या लसणाच्या कळ्या गावरान लसणापेक्षा जाड असतात. आणखी एक फरक म्हणजे या लसणाला जास्त गंध नसतो. याचं कारण यात रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. या लसणामध्ये सिथेंटिक सुद्धा मिक्स केलं जातं. तसेच यात झिंक आणि आर्सेनिकचा वापर केला जातो. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. चायनीज लसणामध्ये चिकटपणाही कमी असतो.
डुप्लिकेट लसणाची ओळख
बाजारात आजकाल डुप्लिकेट लसूणही विकला जात आहे. यात नुकसानकारक केमिकल्सचा वापर केला जातो. डुप्लिकेट लसणाचं उत्पादन घेण्यासाठी लेड, मेटल आणि क्लोरीनचा वापर केला जातो. अशा लसणाची ओळख पटवण्यासाठी लसणाची गाठ पलटवून बघा. याच्या खालच्या भागावर लसूण पूर्णपणे पांढरा दिसतो आणि त्यावर कोणताही ब्राउन डाग नसतो. अशात हा लसूण डुप्लिकेट असतो.
गावरान लसणाची ओळख
गावरान लसूण हा आकाराने लहान असतो तर चायनीज लसूण आकाराने मोठा, टपोरा असतो. गावरान लसणामध्ये एक हलकीशी निळसर, जांभळट रंगाची छटा असते. लसूण हातात घेतल्यावर ज्याला सुवास येईल, तो लसूण गावरान आहे. लसणाच्या एका बाजुला मुळं असतात. ज्या लसूणाची मुळं काळी किंवा गडद चॉकलेटी रंगाची असतात, तो लसूण खरेदी करावा. गावरान लसणावर बरेच डाग असतात. त्यांची साल पूर्णपणे पांढरी नसते. तसेच गावरान लसणाचा गंध अधिक येतो. तसेच यात चिकटपणाही जास्त असतो. तसेच चायनीज लसूण हा लवकर सोलला जातो. तर गावरान लसूण सोलण्यासाठी जास्त वेळ लागतो.