उन्हाळ्यामध्ये हेल्दी राहण्यासाठी प्या थंडगार कैरीचं पन्हं; शरीराला होतात 'हे' फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 01:10 PM2019-04-05T13:10:30+5:302019-04-05T13:15:38+5:30
उन्हाळ्यामध्ये हेल्दी समर ड्रिंक प्यायल्याने तुम्ही सन स्ट्रोक, डिहाड्रेशन यांसारख्या समस्यांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता. ताक, नारळाचं पाणी, लिंबू सरबत या पेय पदार्थांप्रमाणेच तुम्ही कैरीच्या पन्ह्याचाही आहारात समावेश करू शकता.
उन्हाळ्यामध्ये हेल्दी समर ड्रिंक प्यायल्याने तुम्ही सन स्ट्रोक, डिहाड्रेशन यांसारख्या समस्यांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता. ताक, नारळाचं पाणी, लिंबू सरबत या पेय पदार्थांप्रमाणेच तुम्ही कैरीच्या पन्ह्याचाही आहारात समावेश करू शकता. पन्हं तुम्हाला हीट स्ट्रोक, डिहायड्रेशन इत्यादींपासून स्वतःचं रक्षण करू शकता. अनेकदा उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्ह करण्यात येतं. अनेक लोक याचं सेवनही करतात. याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. कैरीचं पन्ह एक कूलिंग एजेंट आहे. जे शरीराला डिहायड्रेशनपासून दूर ठेवतं. हे प्यायल्याने शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात. यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि पोटॅशिअम असतं. जे शरीरासाठी आवश्यक असतात. जाणून घेऊया कैरीच्या पन्ह्यामुळे होणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...
सन स्ट्रोक
इलेक्ट्रोलाइट्स शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. कारण यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. पीएच लेव्हल नियंत्रित राहते. उन्हाळ्यामध्ये शरीरातून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रोलाइट्स निघून जातात. विशेषतः सोडियम. उन्हाळ्यामध्ये शरीराला येणाऱ्या घामावाटे शरीरातून इलेक्ट्रोलाइट्स निघून जातात. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी कैरीचं पन्ह पिणं फायदेशीर ठरतं.
एनीमिया
एनीमियाची समस्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. एनीमिया तेव्हा होतो, जेव्हा लाल रक्ताच्या पेशींची संख्या किंवा हिमोग्लोबिनचा स्तर कमी होतो. त्यावेळी शरीराच्या पेशींमध्ये ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचत नाही. कैरीचं पन्हं एनीमियापासून सुटका करून घेण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. कैरीचं पन्हं एनीमियाच्या विरोधात लढण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतं. हे रक्ताच्या लाल रक्त पेशी वाढविण्यासाठी मदत करतं.
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी
कैरीच्या पन्ह्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळून येतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी कैरीच्या पन्ह्याचं सेवन करा. यामध्ये अस्तित्वात असलेली पोषक तत्व शरीराच्या मायक्रोब्सपासून लढण्यासाठी मदत करतात.
आतड्यांचं आरोग्य राखण्यासाठी
कैरीचं पन्हं प्यायल्याने पोटाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. पचनक्रिया मजबूत होते. गॅस्ट्रोइन्टेस्टाइनलशी निगडीत समस्याही दूर होतात. कच्च्या आंब्यामध्ये आढळून येणारं अॅसिड पित्ताचं स्त्राव वाढवतो. जो आतड्यांसाठी एखाद्या हिलिंग एजंटप्रमाणे काम करतो.
डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी
यामध्ये अस्तित्वात असणारं व्हिटॅमिन-ए आणि अॅन्टीऑक्सिडंट डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी काम करतात. शरीराला फ्री रेडिकल्सपासून दूर ठेवतात. तसेच हे डोळ्यांच्या रेटिन्याचा डिजेनेरेशन रोखण्यासाठी प्रभावी ठरतात.
असं करा तयार कैरीचं पन्हं :
साहित्य:
- दिड कप कैरीचा गर
- 2 कप साखर
- 1 टिस्पून वेलची पूड
- चिमूटभर केशर
कृती:
- साधारण एक मोठी कैरी कूकरमध्ये शिजवून घ्यावी. थंड झाली कि साल काढून गर वेगळा काढावा. चाळणीवर हा गर गाळून घ्यावा. चमच्याने घोटून दाटसर गर गाळावा.
- एका भांड्यामध्ये साखर घेऊन त्यामध्ये साखरेबरोबर पाणी घेऊन त्याचा पाक तयार करा.
- पाक तयार झाला की गॅस बंद करा त्यात केशर आणि वेलचीपूड एकत्र करावी. त्यानंतर त्यामध्ये कैरीचा गर घालून एकत्र करून घ्या. मिश्रण थंड झाले की, काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून घ्या.
- एका ग्लासमध्ये 2 ते 3 चमचे मिश्रण घ्यावं. त्यामध्ये थंड पाणी घालून ढवळून सर्व्ह करा.
- थंडगार कैरीचं पन्हं
टिप : या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ला या रूपाने बघू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारचं फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.