Diwali 2018 : तुम्हालाही आवडतील असे गुलाबी गुलकंदाचे लाडू!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 07:28 PM2018-11-07T19:28:26+5:302018-11-07T19:30:30+5:30
सध्या दिवाळी सुरू असून सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. कोणताच सण गोड पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. दिवाळीमध्ये फराळाला फार महत्त्व असते. प्रत्येक घराघरात फराळाचे पदार्थ तयार करण्यात येतात.
सध्या दिवाळी सुरू असून सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. कोणताच सण गोड पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. दिवाळीमध्ये फराळाला फार महत्त्व असते. प्रत्येक घराघरात फराळाचे पदार्थ तयार करण्यात येतात. तुम्हीही फराळाच्या पदार्थांपेक्षा थोडे वेगळे पदार्थ तयार करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एका खास पदार्थांची मेजवानी आहे. थोड्याशा हटके स्टाइलचा हा पदार्थ तयार करण्यासाठी फार सोपा आणि चटकन होणारा आहे. जाणून घेऊयात गुलकंदाचे लाडू तयार करण्याच्या रेसिपीबाबत...
साहित्य :
- दूध - 2 लीटर
- लिंबाचा रस - 4 टेबलस्पून
- गुलाबाचे सिरप - 90 ग्रॅम
- गुलाब सार - 1/2 टीस्पून
- पिठीसाखर - 100 ग्राम
- दूध - 50 मि.ली.
- गुलकंद
- सुखलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
कृती :
- सर्वात आधी एका पॅनमध्ये दूध टाकून उकळून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा.
- नासलेलं दूधातून पाणी वेगळं करून एका बाउलमध्ये काढा.
- आता त्यामध्ये गुलाबाचे सिरप, पिठीसाखर, दूध टाकून एकत्र करून घ्या.
- तयार मिश्रण घेऊन त्यामध्ये गुलकंदाचे सारण भरा.
- सर्व बाजूंनी बंद करून लाडूचा आकार द्या.
- तयार झालेले लाडू साधारणतः 30 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.
- गुलाबी रंगाचे गोड गोड गुलकंदाचे लाडू तयार आहेत.