Diwali 2018 : असे तयार करा झटपट खमंग बेसनाचे गोड गोड लाडू!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 05:03 PM2018-11-08T17:03:56+5:302018-11-08T17:06:57+5:30
दिवाळी म्हटलं की सर्वात आधी जीभेवर चव रेंगाळते ती दिवाळीच्या फराळाची आणि त्यातल्या बेसनाच्या लाडवांची. खरं तर आपल्या साऱ्यांकडेच तयार होणाऱ्या बेसनाच्या लाडवांचं मूळ हे महाराष्ट्रातील नव्हेच.
दिवाळी म्हटलं की सर्वात आधी जीभेवर चव रेंगाळते ती दिवाळीच्या फराळाची आणि त्यातल्या बेसनाच्या लाडवांची. खरं तर आपल्या साऱ्यांकडेच तयार होणाऱ्या बेसनाच्या लाडवांचं मूळ हे महाराष्ट्रातील नव्हेच. उत्तर भारतातून महाराष्ट्रात आलेल्या या लाडवांनी पाहता पाहता दिवाळीच्या फराळामध्ये आपलं वेगळं अस्तित्वच निर्माण केलं. हे लाडू करण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि चवीलाही सर्वांना आवडतील असेच असतात.
बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये दिवाळीचा फराळ घरी तयार करणं शक्य होत नाही. तसेच अनेकदा बाजारातून विकत आणण्याची इच्छा होत नाही. अशातच तुम्ही थोडासा वेळ काढून घरच्या घरी हे लाडू तयार करू शकता.
साहित्य :
- 1 कप बेसन
- 3 बारीक तुकडे केलेले बदाम
- ¼ टीस्पून वेलची पावडर
- 50 ग्रॅम तूप
- 3 बारीक कापलेले काजू
- 70 ग्रॅम साखर
कृती :
- सर्वात आधी एखा पॅनमध्ये तूप गरम करून घ्या.
- तूप वितळल्यानंतर त्यामध्ये बेसन एकत्र करून 10 ते 20 मिनिटांपर्यंत भाजून घ्या.
- जेव्हा बेसन हलक्या सोनेरी रंगाचे दिसू लागेल तेव्हा त्यामध्ये वेलची पावडर, काजू आणि बदामाचे तुकडे टाकून एकत्र करा.
- मिश्रण एकजीव झाल्यानंतर गॅसवरून उतरवून थंड होण्यासाठी ठेवा.
- जेव्हा हे थंड होईल त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून एकत्र करून घ्या.
- व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर त्याचे लाडू वळून घ्या.
- झटपट तयार झालेले गोड गोड बेसनाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत.