Diwali 2018 : दिवाळीच्या फराळातील हे पदार्थ महाराष्ट्रीयन नाहीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 05:07 PM2018-11-06T17:07:14+5:302018-11-06T17:07:24+5:30
दिवाळी म्हणजे दिव्यांच्या सण. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दिवाळीतील वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीचा फराळ.
दिवाळी म्हणजे दिव्यांच्या सण. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दिवाळीतील वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीचा फराळ. वेगवेगळ्या चवींचे पदार्थ घराघरांमध्ये तयार करण्यात येतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शहरांनुसार फराळाच्या पदार्थांमध्ये नाविण्यही दिसून येतं.
लाडू, चकली, शंकरपाळी, कडबोळी आणि करंज्यांसारखे अनेक पदार्थ सर्वांच्या घरांमध्ये तयार करण्यात येतातच. पण खरं तर यातले अनेक पदार्थ महाराष्ट्रीयन नाहीत. यातल अनेक पदार्थ हे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले पाहुणे पदार्थ आहे.
खर तर दिवाळीच्या फराळाची मराठी परंपरा फार जुनी आहे. तुलनेने यातील काही पदार्थ काही दिवसांपूर्वीच भारतात आले आहेत. हे ऐकून तुम्हाला खरं वाटणार नाही.
दिवाळीच्या फराळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असतात. त्यामध्ये रव्याच्या, डाळीच्या, बेसनाच्या लाडूंचा प्रामुख्याने समावेश करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? लाडू हा महाराष्ट्रातील नाहीच. लाडू खरं तर महाराष्ट्रात आला तो उत्तर भारतातून.
कडबोळी म्हणजे अस्सल मराठमोळा पदार्थ असा अनेकांचा समज असतो. हल्ली हा पदार्थ फारसा दिसत नाही. पण काही ठराविक भागांमध्ये कडबोळी दिसून येतात. पण खरं तर कडबोळीचं मूळ दक्षिण भारतामध्ये दिसून येतं.
चकली म्हटलं की, गोल गरगरीत आणि काटेरी तिखटसा पदार्थ डोळ्यांसमोर येतो. त्याला देण्यात आलेलं नाव जरी मराठमोळं असलं तरीदेखील चकली हा मूळचा महाराष्ट्रातील पदार्थ नाही. चकलीचा शोध घेतला तर तिचं मूळ दक्षिण भारतामध्ये आढळतं.
करंजी हा पदार्थ भारतभरात वेवेगळ्या नावांनी ओळखला जातो. गुजरातमध्ये घुघरा, उत्तर भारतात गुजिया आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये करंजीला कानवेलही म्हटलं जातं.