Diwali 2019 : फराळासाठी खास खमंग बेसनाचे चवदार लाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 04:39 PM2019-10-23T16:39:19+5:302019-10-23T16:39:52+5:30

दिवाळी म्हणजे, उत्साह त्याला फराळाची जोड. दिवाळी हा शब्द ऐकताच जीभेवर चव रेंगाळते ती, दिवाळीच्या फराळाची. अशातच जर कानावर बेसनाच्या लाडूचं नाव पडलं तर मग काही पाहायलाच नको.

Diwali 2019 : Recipe Of besan laddoo or ladu | Diwali 2019 : फराळासाठी खास खमंग बेसनाचे चवदार लाडू

Diwali 2019 : फराळासाठी खास खमंग बेसनाचे चवदार लाडू

googlenewsNext

दिवाळी म्हणजे, उत्साह त्याला फराळाची जोड. दिवाळी हा शब्द ऐकताच जीभेवर चव रेंगाळते ती, दिवाळीच्या फराळाची. अशातच जर कानावर बेसनाच्या लाडूचं नाव पडलं तर मग काही पाहायलाच नको. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण चवीने खाणारे बेसनाचे लाडू मुळचे आपल्याकडचे नाहीच. उत्तर भारतातून आपल्याकडे आलेला हा पदार्थ पाहता पहता कधी आपला झाला समजलचं नाही. एवढचं नाहीतर या पदार्थाने दिवाळीच्या फराळामध्येही आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं. मुख्य म्हणजे, हे लाडू तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि चव म्हणाल तर भारीच. कधी तोंडात विरघळून जातात समजतच नाही. 

बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये दिवाळीचा फराळ घरी तयार करणं शक्य होत नाही. तसेच अनेकदा बाजारातून विकत आणण्याची इच्छा होत नाही. अशातच तुम्ही थोडासा वेळ काढून घरच्या घरी हे लाडू तयार करू शकता. 

Diwali 2018 recipe of besan laddoo | Diwali 2018 : असे तयार करा झटपट खमंग बेसनाचे गोड गोड लाडू!

साहित्य :

  • 1 कप बेसन
  • 3 बारीक तुकडे केलेले बदाम 
  • ¼ टीस्पून वेलची पावडर
  • 50 ग्रॅम तूप
  • 3 बारीक कापलेले काजू
  • 70 ग्रॅम साखर 

 
कृती :

- सर्वात  आधी एखा पॅनमध्ये तूप गरम करून घ्या. 

- तूप वितळल्यानंतर त्यामध्ये बेसन एकत्र करून 10 ते 20 मिनिटांपर्यंत भाजून घ्या. 

- जेव्हा बेसन हलक्या सोनेरी रंगाचे दिसू लागेल तेव्हा त्यामध्ये वेलची पावडर, काजू आणि बदामाचे तुकडे टाकून एकत्र करा. 

- मिश्रण एकजीव झाल्यानंतर गॅसवरून उतरवून थंड होण्यासाठी ठेवा. 

- जेव्हा हे थंड होईल त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून एकत्र करून घ्या.

- व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर त्याचे लाडू वळून घ्या. 

-  झटपट तयार झालेले गोड गोड बेसनाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत. 

Web Title: Diwali 2019 : Recipe Of besan laddoo or ladu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.