Rava Laddu Recipe : तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 04:38 PM2019-10-21T16:38:53+5:302019-10-21T16:40:11+5:30
Diwali Faral Special : सण-समारंभ म्हणजे खवय्यांसाठी मेजवाणीच आणि त्यात दिवाळी म्हणजे बातच न्यारी. लाडू, चिवडा, चकली असे अनेक फराळाचे पदार्थ घराघरांत तयार केले जातात.
सण-समारंभ म्हणजे खवय्यांसाठी मेजवाणीच आणि त्यात दिवाळी म्हणजे बातच न्यारी. लाडू, चिवडा, चकली असे अनेक फराळाचे पदार्थ घराघरांत तयार केले जातात. पण हल्ली कामाच्या व्यापामुळे फराळ घरी तयार करण्यापेक्षा बाजारातून विकत आणले जातात. पण म्हणतात ना, बाहेरून आणलेल्या पदार्थांना घरातील फराळाची चव कुठे? त्यापेक्षा घरच्या घरी अगदी कमी वेळात तुम्ही फराळाचे पदार्थ तयार करू शकता. आज आम्ही अशीच एक रेसिपी सांगणार आहोत. जाणून घेऊया रव्याचे लाडू तयार करण्याची सहज सोपी रेसिपी...
साहित्य :
रवा
तूप
ओलं खोबरं एक वाटी
साखर एक वाटी
मावा
पाणी
वेलची पूड
रव्याचे लाडू तयार करण्याची कृती :
- सर्वात आधी कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप घ्यावं. तूप वितळल्यानंतर रवा खरपूस भाजून घ्यावा.
- गॅस बंद करून रवा प्लेटमध्ये काढून थंड करा.
- पुन्हा गॅसवर एक कढई गरम करत ठेवा. त्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं, एक वाटी साखर, तीन चमचे पाणी घालून मिश्रण साखर वितळेपर्यंत एकजीव करून घ्या.
- मिश्रण एकजीव झाल्यावर त्यामध्ये मावा एकत्र करा. त्यानंतर ड्रायफ्रुट्स आणि चवीनुसार वेलची पूड एकत्र करा.
- गॅस बंद करून त्यामध्ये खरपूस भाजलेला रवा घालून मिश्रण एकत्र करा.
- तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्या
- रव्याचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत.