Diwali 2024: 'या' वेळेत तळण करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 09:45 AM2024-10-22T09:45:37+5:302024-10-22T09:46:21+5:30
Diwali food recipe 2024: दिवाळीत फराळाचे पदार्थ करायला घेतले की अनेक जणींची तक्रार असते की पदार्थ तेल जास्त पितात, त्यासाठी हे वेळापत्रक नोंदवून घ्या.
>> शुभांगी दामले
दिवाळी जवळ आली आहे. फराळ करायलाही सुरुवात झाली आहे. काही मैत्रिणींना तळण करण्यासाठी योग्य वेळापत्रक हवं होतं. हे वेळापत्रक कसलं? तर तळणीचे पदार्थ करण्याचं! तळण करण्यासाठी असा काळ ज्या वेळेत पदार्थ तेल कमी पितात. काही लोक याला निरर्थक समजतात. समजू देत. याला माझी काहीही हरकत नाही. ज्यांना पटत असेल, त्यांनी , जमलं तर अवलंब करावा. अन्यथा निरर्थक समजून सोडून द्यावं. जुन्या लोकांनी समुद्राच्या भरती ओहोटीच्या वेळांचा विचार करून मोठ्या प्रमाणात तळण करायचं असेल तर तेल जास्त लागू नये, पदार्थ तेलकट होऊ नयेत, पदार्थ लवकर तळून व्हावेत यासाठी असं वेळापत्रक ठरवलं होतं. मी त्यानुसार हिशोब करून या वेळा ठरवत असते. मला स्वतःला चांगला अनुभव येतो. इतरांनाही फायदा व्हावा, म्हणून हे तयार केलेलं वेळापत्रक सर्वांसाठी पाठवत आहे. यात नमूद केलेल्या वेळा दुपारपूर्व व दुपारनंतर ,दोन्ही वेळांसाठी (a.m. / p.m.) उपयुक्त आहेत. कारण समुद्राला दोन वेळा भरती येते.(१२ तासांनी). तुम्हालाही हे वेळापत्रक उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
वेळापत्रक:
दि. १९-१०-२०२४ ------ १२:०० ते ३:००
दि.२०-१०-२०२४ -------- १२:४५: ते ५:४५
दि.२१-१०-२०२४ -------- २:४५ ते ५:४५
दि. २२-१०-२०२४ ------ ३:३० ते ६:००
दि.२३-१०-२०२४ ------- ३:४५ ते ६:४५
दि. २४-१०-२०२४ ------- ४:३० ते ७:३०
दि. २५-१०-२०२४ ------- ५:१५ ते ८:१५
दि. २६-१०-२०२४ ------- ६:०० ते ९:००
दि.२७-१०-२०२४ ------- ६:४५ ते ९:४५
दि.२८-१०-२०२४ -------- ६:४५ ते ९:४५
दि. २९-१०-२०२४ ------- ७:३० ते १०:३०.
या वेळांच्या दरम्यान तळण करावं. वेळ, तेल दोन्हींची बचत करावी. पदार्थ तेलकट न होता, कुरकुरीत होतात. आपली दिवाळी आनंददायी जावो या शुभेच्छा!