मुळ्याच्या भाजीचे हे फायदे वाचल्यावर तुम्ही भाजी कधीच फेकणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 11:26 AM2019-01-22T11:26:05+5:302019-01-22T11:28:02+5:30
मुळ्याची पानांचीही भाजीही बनवता येते. मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते.
(Image Credit : Foods Portal)
हिवाळा आला की, वेगवेगळ्या हिरव्या भाज्या खाण्याचा सपाटाच लावला जातो. याच मोसमात मुळाही अधिक प्रमाणात खाल्ला जातो. मुळा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हा एक प्रकारचा कंद आहे. याची भाजी, कोशिंबीर किंवा परोठे करतात. पण अनेकजण मुळ्याची भाजी फेकून देतात.
मुळ्याची पानांचीही भाजीही बनवता येते. मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते. कित्येक लोक मुळ्याची पाने चिरून त्यात हरबऱ्याच्या डाळीचे पीठ पेरून स्वादिष्ट भाजी करतात. तर काही लोक त्याच्या मुठिया (मुटकुळी) आणि थालिपीठेही करतात. ज्याप्रमाणे मुळ्याचे आरोग्यदायी फायदे आहेत तसेच मुळ्याच्या भाजीचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मुळ्याच्या भाजीमध्ये आयर्न, कॅल्शिअम, फोलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फोरस भरपूर प्रमाणात असतात.
डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी
मुळ्याची भाजी ही ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवते. त्यामुळे ज्यांना डायबिटीजची समस्या आहे त्यांनी मुळ्याच्या भाजीचं सेवन करावं. या पानांचा ज्यूस बनवूनही सेवन केला जाऊ शकतो.
पोटदुखीपासून आराम
मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. इतकेच नाही तर ही भाजी खाल्ल्याने केसगळतीची समस्याही दूर होते.
मुत्राशय स्वच्छ करते
मुळ्याची पाने मुत्राशय स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या भाजीमध्ये स्टोन डिजॉल्वची क्षमता असते. त्यामुळे यासाठी या भाजीचं नियमीत सेवन करणे फायदेशीर ठरतं.
पाइल्सची समस्या होईल दूर
पाइल्सच्या रुग्णांनी मुळा किंवा मुळ्याच्या भाजीचं नियमीत सेवन करणे फायदेशीर ठरतं. मुळ्याच्या भाजीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्याने सूजही दूर करण्यास मदत मिळते.
इम्यून सिस्टम करते मजबूत
मुळ्याच्या पानांमुळे इम्यून सिस्टिम मजबूत होण्यास मदत मिळते. त्यासाठी पानांची भाजी करा किंवा पराठे करा. याने शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. तसेच तुमचा थकवाही दूर होतो.