शरीरासाठी लाभदायक ठरतात पॉपकॉर्न; फक्त 5 मिनिटांत घरीच तयार करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 06:04 PM2019-01-10T18:04:30+5:302019-01-10T18:07:42+5:30
थिएटरमध्ये मुव्ही पाहताना इंटरव्हलमध्ये अनेकांना पॉपकॉर्न खाण्याची सवय असते. मूव्ही आणि पॉपकॉर्न हे समीकरणच तयार झालं आहे. पॉपकॉर्न नसेल तर मूव्ही पाहण्यात काहीतरी कमी होतं, असं अनेकदा जाणवतं.
थिएटरमध्ये मुव्ही पाहताना इंटरव्हलमध्ये अनेकांना पॉपकॉर्न खाण्याची सवय असते. मूव्ही आणि पॉपकॉर्न हे समीकरणच तयार झालं आहे. पॉपकॉर्न नसेल तर मूव्ही पाहण्यात काहीतरी कमी होतं, असं अनेकदा जाणवतं. सध्या तर बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या पॉपकॉर्नच्या 2 मिनिटांत बनणाऱ्या पाकिटांमुळे घरच्या घरीही सहज पॉपकॉर्न तयार करता येतात. टीव्हीवर एखादी रंगलेली मॅच असेल किंवा घरच्या घरी एखादा मूव्ही बघण्याचा बेत असेल तर सहज घरी पॉपकॉर्न तयार करून पॉपकॉर्न आणि मूव्हीचं समीकरण जुळवून आणता येतं. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही घरच्या घरी अगदी सहज पॉपकॉर्न तयार करू शकता. त्यासाठी बाजारातून पॉपकॉर्न पॅकेट्सही विकत आणण्याची गरज नाही. हे पॉपकॉर्न शरीरासाठीही अत्यंत लाभदायक असतात. जाणून घेऊया पॉपकॉर्नपासून शरीराला होणारे फायदे आणि घरच्या घरी पॉपकॉर्न तयार करण्याच्या रेसिपीबाबत...
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील पेंसिलवेनियामध्ये झालेल्या नॅशनल मीटिंग ऑफ द अमेरिकन डॉक्टर्स सोसायटीच्या बैठकीत एका संशोधनाचा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये पॉपकॉर्न खाल्याने शरीराला होणाऱ्या फायद्याबाबत सांगण्यात आले होते. यूनिवर्सिटी आफ स्कार्नटनच्या संशोधकांनी शोधातून असा दावा केला आहे की, पॉपकॉर्नमध्ये असलेलं फायबर आणि पालीफिनाइल वृद्ध व्यक्तींमधील कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित रोगांसंबधिच्या सर्व समस्या कमी करण्याच काम करतात.
संशोधनातून असं सांगण्यात आलं आहे की, पॉपकॉर्नमध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट शरीरातील फ्री रेडिकल्स बाहेर टाकण्याचं काम करतात. फ्री रेडिकल्स म्हणजे शरीरातील अशी तत्व जी शरीरातील पेशी आणि स्नायूंना नष्ट करतात. याशिवाय पॉपकॉर्न बद्धकोष्ट, लठ्ठपणाच्या समस्येवरही फायदेशीर ठरतं.
टॉमेटो पॉपकॉर्न तयार करण्याची रेसिपी :
पॉपकॉर्न खाण्यासाठी अगदी चविष्ट लागतात. सध्या बाजारामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स एकत्र करून पॉपकॉर्न तयार करण्यात येतात. आज आपण टॉमेटो पॉपकॉर्न तयार करण्याची रेसिपी जाणून घेऊया...
साहित्य :
- 1 कप पॉपकॉर्न
- 1 टेबलस्पून तेल किंवा बटर
- 2 टेबलस्पून टॉमेटो सॉस
- 1/4 टीस्पून काळी मिरची पावडर
- कढई
कृती :
- एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा.
- तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टॉमेटो सॉस एकत्र करा.
- हे मिश्रण थोडं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये पॉपकॉर्न एकत्र करा.
- थोडा वेळ झाकण ठेवून त्यानंतर वरून काळी मिरी पावडर टाकून पुन्हा एकत्र करा.
- गॅस बंद करून पॉपकॉर्न सर्व्ह करा.