काळा तांदूळ आरोग्यासाठी ठरतो फायदेशीर; 'हे' आहेत फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 04:15 PM2018-11-24T16:15:02+5:302018-11-24T16:18:31+5:30

आपल्यापैकी अनेक लोक जेवणात फक्त भातच खातात. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जेवणातही भाताचा समावेश करण्यात येतो. परंतु आपण ज्या पांढऱ्या तांदळाचा आहारात समावेश करतो त्यामध्ये अनेक अशी तत्व आढळून येतात, ज्यांचं अतिसेवन करणं शरीराला नुकसानदायी ठरतं.

do you like rice try sometime black rice also | काळा तांदूळ आरोग्यासाठी ठरतो फायदेशीर; 'हे' आहेत फायदे!

काळा तांदूळ आरोग्यासाठी ठरतो फायदेशीर; 'हे' आहेत फायदे!

आपल्यापैकी अनेक लोक जेवणात फक्त भातच खातात. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जेवणातही भाताचा समावेश करण्यात येतो. परंतु आपण ज्या पांढऱ्या तांदळाचा आहारात समावेश करतो त्यामध्ये अनेक अशी तत्व आढळून येतात, ज्यांचं अतिसेवन करणं शरीराला नुकसानदायी ठरतं. जर तुम्हाला यापासून बचाव करायचा असेल तर आहारामध्ये पांढऱ्या तांदळाऐवजी काळ्या तांदळाचा (ब्लॅक राइस) समावेश करा. काळा तांदूळ शरीरासाठी फायदेशीर ठरतो त्याचप्रमाणे यातील पोषक तत्व शरीरासाठी फायदेशीर ठरतात. 

अॅन्टी-ऑक्सिडंट 

काळ्या तांदळामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. त्याचप्रमाणे हे शरीर डिटॉक्स करून अनेक गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करतात. 

हृदयासंबंधी आजारांमध्ये फायदेशीर 

हृदय रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी काळा तांदूळ वरदान ठरतो. संशोधनानुसार काळ्या तांदळामध्ये एंथोसाइनिन तत्व आढळून येतं. जे धमन्यांमधून रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसेच यामुळे हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो. 

अल्जायमर, डायबिटीज आणि कॅन्सरवर परिणामकारक

डायबिटीज, अल्जायमर व्यतिरिक्त शारीरिकरित्या कमजोर असणाऱ्या लोकांसाठी काळा तांदूळ फायदेशीर ठरतो. त्याचप्रमाणे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठीही हा तांदूळ फायदेशीर ठरतो.  

प्रोटीन आणि आयर्न मुबलक प्रमाणात

काळ्या तांदळामध्ये दुसऱ्या तांदळांच्या तुलनेत सर्वाधिक प्रोटीन असतं. तसेच यामध्ये आयर्नची मात्राही भरपूर प्रमाणात असते. 

ब्रेस्ट कॅन्सर

काळ्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आढळून येतं. त्यामुळे पोटाच्या समस्यांपासून सुटका होते. त्याचबरोबर शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर करून ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव होतो. 

शरीरात सूज 

काळ्या तांदळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होते. ज्यामुळे लिव्हरला येणारी सूज आणि वेदनांपासून सुटका मिळते. 

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 

काळा तांदळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

Web Title: do you like rice try sometime black rice also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.