डॉक्टरांनी सांगितली शिळी चपाती खाण्याची योग्य पद्धत, वजनही वाढेल अन् फुप्फुसं होतील साफ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:04 PM2024-10-28T12:04:25+5:302024-10-28T12:05:19+5:30

या हिवाळ्यात तुम्ही एक जुना उपाय वापरून शरीर मजबूत बनवू शकता. पूर्वी लोक शिळी चपाती दुधासोबत खात होते, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते.

Doctor told right way to eat basi roti with milk for weight gain | डॉक्टरांनी सांगितली शिळी चपाती खाण्याची योग्य पद्धत, वजनही वाढेल अन् फुप्फुसं होतील साफ!

डॉक्टरांनी सांगितली शिळी चपाती खाण्याची योग्य पद्धत, वजनही वाढेल अन् फुप्फुसं होतील साफ!

अनेकदा कमजोर शरीर तुमच्या गमतीचं कारण बनतं. ज्यांचं शरीर कमजोर असतं किंवा जे फार सडपातळ असतात त्यांचं लोक मानसिक रूपानेही खच्चीकरण करतात. इतकंच नाही तर शरीर कमजोर असेल तर शरीरात वेगवेगळ्या समस्याही होतात. कमजोर व्यक्तीला लवकर थकवा, श्वास भरून येणे, अंगदुखी, डोकेदुखी अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

जर तुम्हाला शरीर मजबूत बनवायचं असेल आणि वजन वाढवायचं असेल तर त्यासाठी आहार तसा घ्यायला हवा. या हिवाळ्यात तुम्ही एक जुना उपाय वापरून शरीर मजबूत बनवू शकता. पूर्वी लोक शिळी चपाती दुधासोबत खात होते, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते. हाच उपाय अधिक प्रभावी करण्याची पद्धत डॉ. निशांत गुप्ता यांनी सांगितली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी इन्स्टावर पोस्ट केला आहे. 

रात्री शिल्लक राहिलेली चपाती अधिक हेल्दी

सामान्य रात्री १ ते २ चपात्या एक्स्ट्रा बनवल्या जातात. जेणेकरून सगळ्यांना पोटभर जेवता यावं. मात्र, बरेच लोक रात्री शिल्लक राहिलेली चपाती शिळी समजून फेकून देतात किंवा कुत्र्याला टाकतात. मात्र, ही चपाती सकाळी खाऊन तुम्ही वजन वाढवू शकता. तसेच याने शरीराची कमजोरी आणि थकवाही दूर होतो.

कसं कराल सेवन?

- सकाळी शिळी चपाती मोहरीचं तेल किंवा तूपात परतवून घ्या. 

- चपाती चांगली कुरकुरीत होईलपर्यंत तेलात किंवा तूपात परतवा. 

- चपाती थंड झाल्यावर हाताने बारीक करा. यासाठी तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता.

- नंतर एक पॅनमध्ये गूळ वितळवून घ्या आणि यात दूध मिक्स करा. हे मिश्रण घट्ट होऊ द्या.

- नंतर यात चपात्यांचा चुरा टाका. 

- त्यानंतर हे मिश्रण एका प्लेटवर तूप लावून पसरवा आणि नंतर बर्फीच्या आकारात ते कापा.

वजन वाढले आणि फुप्फुसं मजबूत होतील

डॉक्टर निशांत गुप्ता यांच्यानुसार, शिळ्या चपातीचा हा उपाय केल्याने वजन कमी असण्याची तुमची समस्या दूर होईल. यात कॅलरी कमी आणि भरपूर पोषक तत्व असतात. ज्यामुळे मसल्स आणि हेल्दी फॅट वाढण्यास मदत मिळते. त्याशिवाय डॉक्टर असंही म्हणाले की, या उपायाने फुप्फुसांची समस्याही दूर होईल. याने फुप्फुसात कफ जमा होणार नाही.

किती दिवस कराल हा उपाय?

डॉक्टरांनुसार, जर तुमचं वजन फारच कमी असेल आणि सतत खोकला, सर्दी, श्वास भरून येणे अशा समस्या होत असतील तर हा उपाय सतत ४० दिवस करा. जर बर्फी बनवायची नसेल तर या मिश्रणाचं १-१ चमचा सकाळी आणि सायंकाळी सेवन करा. डॉक्टरांनुसार, तुम्ही हे मिश्रण एकदाच ५ ते ७ दिवसांसाठी बनवून ठेवू शकता. 

Web Title: Doctor told right way to eat basi roti with milk for weight gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.