जिऱ्याचं पाणी प्यायल्याने गॅसची समस्या खरंच दूर होते का? जाणून घ्या कसा कराल उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 10:54 AM2024-11-09T10:54:24+5:302024-11-09T10:54:57+5:30
Cumin Water for Gas : एक खास उपाय म्हणजे जिऱ्याचं पाणी. पण खरंच जिऱ्याचं पाणी प्यायल्याने गॅसची समस्या दूर होते का? चला तर जाणून घेऊ कसा होतो याचा फायदा...
How to Make Cumin Water for Gas : पोटासंबंधी समस्या जसे की, गॅस, अॅसिडिटी, अपचन किंवा पोट फुगणे या समस्या आजकाल कॉमन झाल्या आहेत. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे पोटासंबंधी या समस्या होत असतात. आयुर्वेदात या समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यांचा वापर करून गॅसची समस्या दूर होऊ शकते. यातीलच एक खास उपाय म्हणजे जिऱ्याचं पाणी. पण खरंच जिऱ्याचं पाणी प्यायल्याने गॅसची समस्या दूर होते का? चला तर जाणून घेऊ कसा होतो याचा फायदा...
जिऱ्यामधील पोषक तत्व
जिरे भारतीय किचनमध्ये वापरला जाणारा फार जुना मसाला आहे. या जेवणाची टेस्ट तर वाढतेच, सोबतच यात अनेक औषधी गुणही असतात. जिऱ्यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट, अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी बॅक्टेरिअल गुण असतात. याने पचन तंत्र चांगलं राहतं आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात.
कसं बनवाल जिऱ्याचं पाणी?
जिऱ्याचं पाणी तयार करणं फारच सोपं आहे. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाकून रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गरम करा, गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर सेवन करा.
गॅसची समस्या कशी दूर करतं जिऱ्याचं पाणी?
पचनक्रिया सुधारते
जिऱ्याच्या पाण्यामुळे शरीरात पचनासाठी आवश्यक एंझाइम अधिक प्रमाणात रिलीज होण्यास मदत मिळते. ज्यामुळे अन्न चांगल्या पद्धतीने पचन होतं. यामुळे पोटात गॅस होण्याचा धोका कमी होतो.
अॅसिडिटी आणि अपचन दूर होतं
जिऱ्याच्या पाण्यामुळे अॅसिडिटी आणि अपचनाची समस्या दूर करण्यास मदत मिळते. ज्यामुळे पोट हलकं जाणवतं.
ब्लोटिंग होत नाही
पोटात सूज किंवा पोट फुगण्याची समस्या असल्यावर जिऱ्याच्या पाण्याचं सेवन केल्यास आराम मिळतो. याने गॅस्ट्रिक गॅस शरीरातून बाहेर निघण्यास मदत मिळते.
मेटाबॉलिज्म बूस्ट
रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे शरीरात अन्न लवकर तोडलं जातं आणि पचनही लवकर होतं.
काही रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, जिरे गॅस्ट्रिक समस्या दूर करण्यास प्रभावी ठरतं. कारण यातील तत्व पचन तंत्राच्या मसल्सना रिलॅक्स करतात. तसेच जिऱ्यामुळे आतड्यांचं आरोग्यही चांगलं राहतं. मात्र, जर तुम्हाला पोटासंबंधी काही गंभीर समस्या असेल तर केवळ हा उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.