कोणत्या वेळी केळी खाणं जास्त फायदेशीर?; जाणून घ्या आयुर्वेदाचा सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 12:44 PM2019-06-19T12:44:24+5:302019-06-19T12:44:50+5:30
फळं खाताना अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच की, कोणतं फळं कधी खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं? सर्व फळांमधील केळींबाबत म्हणायचं झालचं, तर जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, हे सकाळी नाश्त्याच्या वेळी खाणं जास्त फायदेशीर ठरतं.
फळं खाताना अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच की, कोणतं फळं कधी खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं? सर्व फळांमधील केळींबाबत म्हणायचं झालचं, तर जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, हे सकाळी नाश्त्याच्या वेळी खाणं जास्त फायदेशीर ठरतं. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहित नसतं की, केळी खाण्याची योग्य वेळ काय असते? आयुर्वेदामध्ये याबाबत सांगण्यात आलं आहे. जाणून घेऊया नक्की केळी खाण्याची योग्य वेळ काय?
अनेकांचा आवडता नाश्ता आहे दूध आणि केळी
केळी आणि दूध जुन्या काळापासून अनेकांचा आवडता आहार झाला आहे. अनेकदा लोक याचं सेवन वजन वाढविण्यासाठी करतात. केळ्यामुळे त्यांना लगेच ऊर्जा मिळते. पण सकाळच्या वेळीचं दूध आणि केळी खाणं फायदेशीर ठरतं? अद्यापही अनेक लोकांना केळी खाण्याची योग्य वेळ माहीत नाही.
जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे :
केळी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात याबाबत कोणाचेच दुमत नाही. हृदयाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठई केळी अत्यंत फायदेशीर ठरतात. ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, बद्धकोष्ट आणि आल्सरच्या समस्या दूर करण्यासाठी केळी मदत करतात. केळी खाल्याने शरीराचं तापमानही नियंत्रित राहण्यास मदत होते. तसं पाहायला गेलं तर केळी कधीही खाण्यात येतात. पण खरचं केळी खाण्याची योग्य वेळा काय आहे? हे अनेकांना माहीत नसते.
अनोशापोटी खाऊ नका
सकाळच्या नाश्त्यामध्ये केळीचा समावेश करणं उत्तम आहे. परंतु, अनोशापोटी खाणं शक्यतो टाळावं. केळीसोबत ड्रायफ्रुट्स, सफरचंद आणि इतर फळांचंही सेवन करावं. ज्यामुळे शरीरामध्ये आम्लीय पदार्थांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. केळीमध्ये असलेलं मॅग्नेशियम रक्तामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमची पातळी बिघडवण्याचं काम करतं. यामुळे कार्डियोवास्कुलर सिस्टमवर परिणाम होऊ शकतो. हृदयाच्या आरोग्यासाठी अनोशापोटी केळी खाणं योग्य नाही.
ही नाही योग्य वेळ
सकाळी अनोशापोटी केळी खाल्याने भूक मरते. हे शरीरासाठी फायदेशीर ठरत नाही. अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी केळी खातात. शक्यतो असं करणंही टाळावं. कारण रात्री केळी खाल्याने तुम्ही आजारी पडू शकता. रात्री केळी खाल्याने खोकल्याची समस्या होऊ शकते.
काय म्हणतं आयुर्वेद?
आयुर्वेदानुसार, ब्रेकफास्ट केल्यानंतर केळी खाणं फायदेशीर ठरतं. केळी खाण्याची योग्य वेळ सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंतची आहे. पण लक्षात ठेवा. नाश्ता केल्यानंतरच केळी खाणं फायदेशीर ठरतं. आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्यापोटी फळं खाणं शक्यतो टाळावं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.