आता शाकाहारी लोकांनाही खाता येणार मासे; जाणून घ्या कसे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 04:19 PM2018-10-03T16:19:19+5:302018-10-03T16:27:06+5:30
आपण अनेकदा अंड्यांबाबत हा प्रश्न ऐकला असेल की, अंडी शाकाहारी आहेत की मांसाहारी. पण तोच प्रश्न जर तुम्हाला माशांबाबत विचारला तर? थोडा गोंधळ उडाला असेल ना? गोंधळू नका. मासे हे मांसाहारीच आहेत.
आपण अनेकदा अंड्यांबाबत हा प्रश्न ऐकला असेल की, अंडी शाकाहारी आहेत की मांसाहारी. पण तोच प्रश्न जर तुम्हाला माशांबाबत विचारला तर? थोडा गोंधळ उडाला असेल ना? गोंधळू नका. मासे हे मांसाहारीच आहेत. पण जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला मासे खायचे असतील तर आता निश्चिंत होऊन खाऊ शकता. थांबा... थांबा, घाबरून जाऊ नका. हा मासा शाकाहारीच असणार आहे.
लंडनमधील डॅनियल सॅटन नावाच्या एका हॉटेलमध्ये शाकाहारी लोकांसाठी एक खास मासा तयार केला आहे. केळफूल आणि समुद्रातील वनस्पतींपासून हा मासा तयार करण्यात आला असून हा मासा खाण्यासाठी अनेक लोकांनी या हॉटेलमध्ये गर्दी केली आहे.
काही दिवसांपूर्वी लंडनमधील एका चिप्स शॉपमध्ये शाकाहारी माशांसोबत बटाट्याचे चिप्स देण्याचा नवा प्रयोग मालकाने करून पाहिला. मांसाहारी नसला तरी हा पदार्थ तयार करण्याची पद्धत आणि आकार हा मांसाहारी पदार्थांप्रमाणेच होता. त्यामुळे शाकाहारी माणसं हा पदार्थ खाणं टाळत होते. त्यातील एका माणसाने तो पदार्थ खाण्याचं धाडस केलं आणि त्याची चव चाखून तो त्या पदार्थाच्या प्रेमातच पडला. त्याचं पाहून इतरही लोकं या पदार्थाचा आस्वाद घेण्याचा धाडस करू लागले. बघता बघता सर्व शाकाहारी लोकं हा पदार्थ खाण्यासाठी या हॉटेलमध्ये गर्दी करू लागले.
तुम्हालाही शाकाहारी मासा खाण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला 5.50 पौंड म्हणजेच 517 रूपये मोजावे लागणार आहेत. केळफूल आणि समुद्री वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या मिश्रमाला माशांचा आकार देऊन हा पदार्थ तयार करण्यात येतो. लंडनमध्ये करण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या हॉटेल मालकाने इतर शाकाहारी देशांतही हा प्रयोग करणार असल्याचं सांगितलं.